नाशिक - अमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कंबर कसली असून नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सायने शिवारात तब्बल 137 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एका संशयिताला बेड्या तर दोघे फरार -
मालेगाव शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात सुरू असलेल्या कारवाईत रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला बेड्या ठोकण्यात आले असून अन्य दोघे फरार आहेत. तर संशयिताला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कंबर कसली असून मालेगाव तालुक्यातील सायने शिवारात तब्बल १३७ किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच 28 किलो गांजा जप्त -
मालेगावच्या सायने शिवारात अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे समजल्यानुसार पोलिसांनी सापळा रचत एका कारमधून सहा गोणीत आणलेला 137 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत 11 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन संशयितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे .दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच 28 किलो गांजा मालेगावात जप्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा - नाशकात विष घेऊन तरुणाची आत्महत्या