ETV Bharat / city

Nagpur Murder Case : जुन्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दोन आरोपींना अटक - अंबाझरी तलाव परिसरात हत्या

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी मिळून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली ( Youth killed in Nagpur) आहे. नागपूर शहरातील राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाझरी तलाव परिसरात ही घटना घडली आहे.

Nagpur Murder Case
तरुणाची दगडाने ठेचून हत्या
author img

By

Published : Jul 20, 2022, 6:19 PM IST

नागपूर - जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी मिळून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली ( Youth killed in Nagpur) आहे. नागपूर शहरातील राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाझरी तलाव परिसरात ही घटना घडली आहे. संघर्ष मेश्राम (२६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर शुभम उर्फ बॉबी साहू आणि शहरूम पटेल असे आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

डोक्यावर दगडांनी वार करुन केली हत्या - मृतक संघर्ष आणि आरोपी बॉबी, शहरूम पटेल हे तिघेही अंबाझरी तलाव परिसरामध्ये फिरायला आले होते. एकमेकांची टिंगल करत असताना त्यांच्यात जुना वाद उफाळून आला. त्यानंतर त्यांनी संगनमत करून संघर्षच्या डोक्यावर दगडांनी वार करून हत्या केली आहे. त्यानंतर दोनही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे.

हत्येच्या घटनांमध्ये वाढ - गेल्या पाच दिवसांत नागपूर शहराच्या विविध भागात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. १४ जुलै रोजी शंकरनगर चौकात सरोज ऊर्फ सोनू याची पेट्रोलपंपवर पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून हत्या करण्यात आली. १८ जुलै रोजी सकाळी पाचपावलीत दीक्षित जनबंधू या आरोपीने आसिफ खानची दगडाने ठेचून हत्या केली.

हेही वाचा - Several Deaths in Howrah Due to Hooch:पश्चिम बंगालच्या हावडामधील घुसुरीत विषारी दारु पिल्‍याने 9 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.