ETV Bharat / city

झोपेतच डोक्यात टिकास मारून तरुणाची नागपूरमध्ये हत्या, आरोपींचा शोध सुरू - नागपूर क्राइम न्यूज

कमलेश हिरडे असे हत्या झालेल्या मृत तरुणाचे नाव आहे. कमलेश झोपलेला असताना आरोपींनी त्याची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. मात्र कमलेशची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणाने झाली या बाबतचा तपास कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे.

तरुणाची हत्या
तरुणाची हत्या
author img

By

Published : Oct 29, 2021, 4:05 PM IST

नागपूर - शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नर्सिंग टॉकीज परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. कमलेश हिरडे असे हत्या झालेल्या मृत तरुणाचे नाव आहे. कमलेश झोपलेला असताना आरोपींनी त्याची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. मात्र कमलेशची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणाने झाली या बाबतचा तपास कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे.

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

आज सकाळी नर्सिंग टॉकीज परिसरातील मार्गावर कमलेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. याबाबत स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्याला सूचना दिली. पोलिसांनीदेखील तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला आहे. कमलेशसोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मात्र प्राथमिक तपासात कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

आरोपींचा शोध सुरू

मृत कमलेश हिरडे हा कोतवाली परिसरात मिळेल ते काम करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होता. अज्ञात आरोपीने कमलेशच्या डोक्यावर टिकास मारून त्याची हत्या केली. कमलेशची हत्या कोणत्या कारणाने झाली आणि किती आरोपींनी केली या संदर्भात खुलासा झालेला नाही. पोलिसांनी कमलेशच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.