ETV Bharat / city

सरकार केव्हा पडेल कळणारही नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसऱ्या मेळाव्यातील भाषणात 'हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे वक्तव्य केले होते. त्याला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

fadnavis
fadnavis
author img

By

Published : Oct 16, 2021, 9:26 AM IST

Updated : Oct 16, 2021, 5:13 PM IST

नागपूर - शिवसेनाच्या दसऱ्या मेळाव्यात विचारांचे सोने लुटले जायचे तिथे जनतेने वरपास केलेल्या आणि बेईमानीने सत्तेत आलेले मुख्यमंत्री हे गरळ ओकताना दिसून आले असा पलटवार राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून माध्यमांसमोर बोलताना केला. दसरा मेळाव्यातुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यानी सरकार पडण्याच्या पर्यंत करत आहे म्हणत भाजपावर केलेल्या टीका केली. जेव्हा सरकार पडेल तेव्हा कळणार नाही असे उत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचेही टीका त्यांनी केली.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांशा -

जनतेने भाजपला नाकारले नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारले आहे, तर शिवसेनेला वरपास केले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कदाचित विस्मरण झाले आहे. भाजप लढलेल्या 70 टक्के जागा जिंकल्या आहे, शिवसेना 45 टक्के जागा जिंकल्या. त्यामुळे शिवसेनेना जतनेशी बेईमानी करत सत्तेत आली आहे. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांशा होती, त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी कोणा कोणाला डाववले याचा पाढा वाचला. पण हा भाबळेपणाचा मुखवटा काढला पाहिजे. मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा होती ती पूर्ण केली. त्यात काही चुकीचे नाही, पण ते लपवत तत्वज्ञान उभे करणे हे मात्र चुकीचे असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

एवढेच होते तर शिवसैनिकांला मुख्यमंत्री करता आले असते -

बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हा दिलेले शब्द पूर्ण करायचा होता तर एखाद्या शिव सैनिकालाही मुख्यमंत्री करता आले असते. दिवाकर रावते, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे मान्यवर मंडळी शिवसेनेत होती. जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे न्हवते तर नारायण राणे याना पक्षातून का बाहेर जावे लागले, त्यांना पक्षप्रमुख बनायचे नव्हते. राज ठाकरे यांना सेवेतून का बाहेर पडावे लागले. तुमची महत्वकांक्षा होती ती पूर्ण केली पण आम्हाला दोष देणे थांबवा. तो मुखवटा आता काढून फेका... महाराष्ट्राचा बंगाल करायचाय म्हणजे लोकांचे मुंडके छटायचे आहे का? बंगालमध्ये युनियन बाजी आणि खंडणीबाजीमुळे एक उद्योग टिकला नाही, एकेकाळी कलकत्ता देशाची आर्थिक राजधानी होती, आज तिथली अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलले त्याची हातपाय, मुनके छाटून फासावर लटकवायचे आहे का? असा सवाल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजाप मात्र रक्ताचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला. कोणाचे काहीही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू. संघराज्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलून टाकण्याचे मनसुबे बोलुन दाखवले. पण आम्ही ते संविधान बदलू देणार नाही. संविधान बदलण्याचा छुपा अजेंडा काही पक्ष आणि कम्युनिस्ट डाव्या विचारसरणीच्या लोकांना घेऊन करत आहे ते मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही.

ठाकरे सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भष्ट्र सरकार -

ईडी, सीबीआय ही उच्च न्यायालयाने आणली आहे, भाजपांनी आणली नाही. महाराष्ट्राच्या सर्वात भ्रष्ट सरकारचे नेतृत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहे. याची इतिहासात भष्ट्र सरकार म्हणून नोंद होईल हे लक्षात ठेवा. या सरकारचा खंडणी वसुली हा एकच अजेंडा असल्याची घणाघाती टीकाही केली. राज्याचे प्रमुख म्हणून असतांना आयकर विभागाच्या धाडीत जे समोर आले ते पाहता झोप यायला नको. कारण त्यात जे उघड आले त्यामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात दलाली सुरू आहे. काही मंत्र्यांनी तर या वसुलीसाठी साफ्टवेअर बनवले आहे, त्या माध्यमातून कोणाकडून किती वसुली करायची हे काम चालत आहे, यास्तरावर पोहचली दलाली पाहता ईडी आणि सीबीआय येणारच असेही फडणवीस म्हणालेत. ज्यांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना भय असायला पाहिजे.

...तर अर्ध मंत्रीमंडळ आज जेलमध्ये असते -

पंतप्रधान मोदी एजन्सीच्या गैरवापराच्या विरोधात नाही तर महाराष्ट्रातील अर्धे मंत्रीमंडळ जेलमध्ये असतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वायत्त एजन्सीच्या गैरवापरच्या विरोधात आहे. ते कधीही एजन्सीच्या गैरवापर करू देत नाही, त्या एजन्सीच्या कामाच्या मध्ये येत नाही, त्याचा वापर करत नाही. जर या एजन्सीच्या वापर केला असता तर अर्ध मंत्रीमंडळ आज जेलमध्ये असते, पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे होते, मागील वेळी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी जो दुरूपयोग केला तसा दुरूपयोग आम्ही कधीच करणार नाहीत. पण भष्ट्राचार संपवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही.

भाजपा हाच नंबर एकच पक्ष असेल -

दसरा मेळाव्यात केवळ गरळ ओकताना मुख्यमंत्री यांच्या नैराश्य त्यांच्या तोंडुन बोलत होते, चुकीच्या संघ केला तर असेच होईल असे वक्तव्य त्यांच्या तोंडुन निघेल. भाजपाचे नामोहरण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपाचा पाया हा भक्कम असल्याने उभेच राहू तुम्ही कशाचाही उपयोग केला तर भाजपा हा पहिल्या नंबरचा पक्ष असेल.

ज्या दिवशी सरकार पडेल...त्यादिवशी कळणार पण नाही -

सरकार पाडून दाखवा असे जे म्हणतात ज्यादिवशी सरकार पडायचे असेल त्या दिवशी समजणार पण नाही असे उत्तर फडणवीस यांनी दिले. सरकार पाडण्यात रस नसून जनतेची काम करण्याचे आमचे लक्ष आहे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला ककाम करून दाखवा, जनतेचे प्रश्न सोडून दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन दाखवा, शेतकऱ्यांशी संवाद करून दाखवा, सरकार आहे शेतकऱ्यांची भेट घेऊन दाखवा, पाडून दखवण्याच्या गर्जना का करता, एकदा चालून तर दाखवा म्हणत प्रश्न केले. ज्यांचा पक्ष उपऱ्यांचा भरवश्यावर ते भाजपला सांगणार का? ज्यांचा अर्धा पक्ष उपऱ्यांचा भरवश्यावर तयार झाला त्यांनी भाजपला सांगावे, कित्येक ठिकाणी शिवसेनेकडे उमेदवार नव्हते तर आम्ही उमेदवार दिल्याचे फडणवीस म्हणालेत. ड्रग्ज विरोधात कारवाई पाहून ठाकरे ऐवजी दुसरे मुख्यमंत्री असते तर त्यांना आनंद झाला असता. मुंबईत या ड्रग्जचा विळखा वाढून युवा पिढी गारद होत आहे, या युवा पिढीला वाचवायचे असेल तर ड्रग्ज विरोधी लढाई लढावीच लागेल. पण हे सरकार नेमके कोणाच्या बाजूने हे सांगावे, ड्रग्ज विकणाऱ्याच्या, वापरणाऱ्या की त्या विरोधात कारवाई करणाऱ्याच्या विरोधात हे स्पष्ट करावे म्हणत असा सवाल ठाकरे सरकारला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा - विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात : अंबिया बहारातील संत्रा बागांना गळती; भावही कोसळले

हेही वाचा - 'पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांना कोणी विचारत नाही' - मंत्री छगन भुजबळ

Last Updated : Oct 16, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.