ETV Bharat / city

काय आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन?, जाणून घ्या ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

आज ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ४ ऑक्टोबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीच्या मैदानावर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस होता विजयादशमीचा असल्यामुळे या भूमीचे नाव दीक्षाभूमी असे झाले. आज दिवसभर याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात.

दीक्षाभूमी
दीक्षाभूमी
author img

By

Published : Oct 15, 2021, 1:28 PM IST

नागपूर - आज ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. दीक्षाभूमी हे बौद्ध बांधवांचे सर्वात महत्वाचे आस्थाकेंद्र आहे. आज दिवसभर याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात.

दीक्षाभूमी
दीक्षाभूमी

महाराष्ट्र शासनाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ घोषित केले

दीक्षाभूमी ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात स्थापित आहे. १४ ऑक्टोबर १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीच्या मैदानावर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस होता विजयादशमीचा. त्यामुळे या भूमीचे नाव दीक्षाभूमी असे झाले. २००१ साली त्याठिकाणी भव्य स्तुपचे निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ घोषित केले आहे. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी देशातून आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येत असतात.

दीक्षाभूमी
दीक्षाभूमी

या काळात विद्यापीठे निर्माण झाली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित बुद्ध धम्माचा स्वीकार केला. बुद्ध धम्म भारतीय धम्म आहे. बौद्ध काळातच भारत देशाचा सर्वांगीण विकास झाला होता. बौद्ध काळातच बुद्ध विहारातून तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन इत्यादी विद्यापीठे निर्माण झाली होती.

दीक्षाभूमी
दीक्षाभूमी
दीक्षाभूमीचा इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रेष्ठ अशा मानवतावादी बुद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबर १९५६ रोजी घेतली. ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती. त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, ती जागा बाबासाहेबांच्या स्पर्शाने पवित्र झाली असल्याची भावना आंबेडकर अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची १४ एकर जागा डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर १९७८ साली बांधकामाला सुरवात करण्यात आली होती. मात्र, संपूर्ण बांधकाम २००१ साली पूर्ण करण्यात आले. दीक्षाभूमीवरील स्तूप हे प्राचीन सोपानापेक्षा वेगळे आहे.

दीक्षाभूमी
दीक्षाभूमी

देशविदेशातून लाखो लोक येतात

प्राचीन काळात सम्राट अशोकांनी बुद्धांच्या शरीरधातूवर अनेक स्तूप बांधले होते. ते सर्व स्तूप भरीव स्वरूपातील होते. मात्र, दीक्षाभूमीवर असलेले स्तूप हे आतून पोकळ आहे. स्तूपाच्या खालच्या भागात डॉक्टर आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे ठेवण्यात आले आहे. तर, बाजूला गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे. त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवास दाखवणारे चित्र प्रदर्शन आहे. स्तूपाच्या वरच्या भागात पाच हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी देशविदेशातून लाखो लोक येतात. दीक्षाभूमीवर येणारे लोक हे पुस्तक खरेदी करून बाबासाहेबांच्या विचारांने प्रेरित होत असल्याचे चित्र दरवर्षी नागपूरला बघायला मिळते.

हेही वाचा - समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ; आणखी 4 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.