ETV Bharat / city

नागपुरात वीकेंड लॉकडाऊनला नागपूरकरांचा प्रतिसाद.. शहरात दोन हजार पोलीस तैनात

author img

By

Published : Apr 10, 2021, 4:57 PM IST

Updated : Apr 10, 2021, 5:06 PM IST

नागपूर शहरात आज केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने नागरिकांनी विनाकारण फिरू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरातील प्रमुख चौक ज्या भागात वर्दळ असते. अशा ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.

weekend lockdown situation in nagpur
weekend lockdown situation in nagpur

नागपूर - राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यात आठवडा हा पूर्ण व्यापारी वर्गाच्या आंदोलनांनी गाजला. कडक निर्बंधासह असलेल्या लॉकडाऊनचा पाहिला आठवडा असल्याने नागरिकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. याला नागरपूरकरांचा प्रतिसाद दिसून आला.

यामध्ये शहरात आज केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने नागरिकांनी विनाकारण फिरू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरातील प्रमुख चौक ज्या भागात वर्दळ असते. अशा ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून घराबाहेर पडण्याचे कारण जाणून घेण्यात आले. यावेळी जे लोक अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडले त्यांना सोडून दिले. तसेच जे विनाकारण बाहेर फिरत होते त्याना पोलिसी भाषेत समजावून सांगण्यात आले आहे.

नागपुरात वीकेंड लॉकडाऊनला नागपूरकरांचा प्रतिसाद
शहरातील गल्लीबोळात शांतता -

नागपूर शहरात काही भागात गर्दीचे परिसर सोडले तर इतरत्र आतमधील गल्ली बोळात शुकशुकाट दिसून आला आहे. मोजकेच लोक जे अत्यावश्यक सेवेत आहेत, तेच लोक हे रस्त्यावर आपल्या कर्तव्यावर जाताना दिसून आले.

रस्त्यावर पोलीस तैनात -

नागपुरात शनिवारी इतर दिवसांच्या तुलनेत 60 ते 70 टक्के गर्दी रस्त्यावर कमी असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. यात शहरात जवळपास दोन हजार पोलीस कर्मचारी हे कर्तव्यावर आहे. जेणेकरून लोक घरात राहील आणि कोरोनाच्या ब्रेक द चेन मोहिमेला तोडण्यास मदत होईल, अशी माहिती सांगितली.

Last Updated : Apr 10, 2021, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.