ETV Bharat / city

पावसाने पाठ फिरवल्याने नागपूर शहरावर पाणी कपातीचे संकट कायम - पावसाळा संपण्याच्या दिशेने वाटचाल

यावर्षी पहिल्यांदाच पावसाळ्यात नागपूरवर पाणीकपातीचे संकट आले आहे. दरम्यान, मध्यप्रदेशच्या चौराई धरणातून काही प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे 5 टक्के पाणीसाठा तोटलडोह धरणात जमा झाले आहे. मात्र, पुढे काय हि चिंता नागपूरकरांसमोर आहे.

तोतलडोह धरण
author img

By

Published : Aug 20, 2019, 11:37 PM IST

नागपूर - पावसाळा संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असली तरी नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अजूनही पाऊस पडलेला नाही. ज्यामुळे येणारे दिवस नागपूरकरांसाठी परीक्षा घेणारे ठरतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पावसाने तोंड फिरवल्याने नागपूर शहरावर पाणी कपातीचे संकट कायम आहे. मध्य प्रदेशच्या चौराई धरणातून काही प्रमाणात पाणी सोडण्यात आले. यामुळे 5 टक्के पाणीसाठा तोतलाडोह धरणात जमा झाले आहे. मात्र, मध्यप्रदेशच्या भरवशावर महापालिका राहणार आहे, की स्वतःची काही व्यवस्था करणार असा प्रश्न आहे.

नागपूरवर पाणीटंचाईचे मोठे संकट

मध्यप्रदेशमधील चौराई धरण मध्यप्रदेश सरकारकडून महाराष्ट्रातून वाहणाऱ्या पेंच नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणामुळे नागपूरच्या पेंच प्रकल्पात येणारे पाणी थांबले आहे. पर्यायाने नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या तोटलडोह धरणात पाणीसाठा झालाच नाही. या वर्षी उन्हाळ्यात तोटलडोह धरणातील डेड स्टाॅक सुद्धा उपसण्यात आला. त्यामुळे हे धरण कोरडे पडले आहे. त्यातच अर्धा पावसाळा निघून गेला. मात्र, अजूनही धरण क्षेत्रात पाऊस पडला नसल्याने हे धरण कोरडे आहे. मात्र, आता मध्यप्रदेशात चांगला पाऊस पडला आणि चौराई धरण भरले आहे. यामुळे मध्यप्रदेश सरकारने 200 क्यूसेक पाणी सोडले आहे. यामुळे या धरणात 5 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सरकार मध्यप्रदेश सरकारसोबत या विषयावर चर्चा सुरू असल्याचे सांगत आहे. दरम्यान, नागपूर महापालिकेवर कधी नव्हे ते यावर्षी भर पावसाळ्यात पाणी कपातीच संकट आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे. तरीदेखील महापालिका याविषयी काहीच नियोजन करत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे.

Intro:पावसाळा संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असली तरी नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अजूनही पाऊस पडलेला नाही,ज्यामुळे येणारे दिवस नागपूरकरांसाठी परीक्षा घेणारे ठरतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.. पावसाने तोंड फिरवल्याने नागपूर शहरावर पाणी कापतीच संकट कायम आहे.... मध्य प्रदेश च्या चौराई धारणा तुन काहीसं पाणी सोडण्यात आले आणि 5 टक्के पाणी तोटलडोह धरणात आलं मग मध्य प्रदेश च्या भरोशावर महापालिका राहणार का की स्वतःची काही व्यवस्था करणार असा प्रश्न आहे Body:मध्यप्रदेश मधील चौराई धरण हे धरण मध्य प्रदेश सरकार कडून महाराष्ट्रात वाहणाऱ्या पेंच नदीवर बांधण्यात आले.....या धरणामुळे नागपूरच्या पेंच प्रकल्पात येणार पाणी थांबलं,पर्यायाने नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या तोटलडोह धरणात पाणी आलंच नाही....या वर्षी उन्हाळ्यात तोटलडोह मधील डेड स्टोक सुद्धा उचलण्यात आला त्यामुळे हे धरण कोरड पडलं , त्यातच अर्धा पावसाळा निघून गेला मात्र अजूनही धरण क्षेत्रात पाऊस पडलाच नाही त्यामुळे हे धरण कोरड आहे,मात्र आता मध्य प्रदेशात चांगला पाऊस पडला आणि चौराई धरण भरलं म्हणून मध्य प्रदेश ने 200 क्यूसेक पाणी सोडलं त्यामुळे या धरणात 5 टक्के साठा निर्माण झाला आहे.... सरकार मध्य प्रदेश सोबत या विषयावर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातंय...नागपूर महापालिकेवर कधी नाही ते पाणी कपातीच संकट आलं भर पावसाळ्यात पाणी कपात सुरू आहे , धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही ही नैसर्गिक आपत्ती आहे मात्र सरकार आहे महापालिकेच याविषयी नियोजन का नाही हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो . मध्य प्रदेश पाणी सोडत नाही तर दुसरी कडे नैसर्गिक संकट आहे यावर यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं महापालिका सांगते

121 विजय(पिंटू) झलके - पाणी पुरवठा सभापती महानगर पालिका

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.