ETV Bharat / city

राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक - विजय वडेट्टीवार - कडक लॉकडाऊन आवश्यक

येणाऱ्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल असं वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. तीन आठवड्यांचा हा लॉकडाऊन कडक स्वरूपाचा असायला हवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Apr 9, 2021, 9:07 PM IST

Updated : Apr 10, 2021, 12:41 PM IST

नागपूर - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात उद्या (शनिवार) पुन्हा मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. त्यानंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवार

आज (शुक्रवार) मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधीपक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला असून, येणाऱ्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले आहे. तीन आठवड्यांचा हा लॉकडाऊन कडक स्वरूपाचा असायला हवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी, अशी मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

परीक्षा पुढे ढकलली
अकरा तारखेला होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे परीक्षा केव्हा होईल याची तारीख नंतर सांगण्यात येईल. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डसह केंद्र सरकार विविध परीक्षा ही पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी केंद्र सरकारकडे महाराष्ट्रकडून केली जाणार आहे.

हेही वाचा- कोरोनामुळे ११ एप्रिलला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

Last Updated : Apr 10, 2021, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.