नागपूर - वीज बिलात सातत्याने वाढ होत आहे. तसेच वीज बिलावर लावलेला प्रचंड भार आणि अधिभारामुळे विदर्भातील जनतेची लूट होत आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणाविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती आज वीज बिलांचे होळी आंदोलन करणार आहे.
औष्णिक वीज प्रकल्प विदर्भात आहेत. या प्रकल्पाला जमीन आणि पाणी विदर्भातील आहे. वीज निर्मितीचे प्रदूषण विदर्भात होत आहे. मात्र याच विदर्भातील जनतेला अधिक वीज बिल द्यावे लागते. त्यामुळे विदर्भातील विजेचे दर निम्मे करावे, बिलावरील स्थिर आकार म्हणजे मीटर भाडे न देण्याचा निर्णय याशिवाय आदि मागण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात येणार आहे.
वीज बिल संदर्भात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी मार्च महिन्यामध्ये चर्चा करण्यात आली होती. त्यांनी विदर्भ आंदोलन समितीच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. तसेच पुढील दोन महिन्याचा वेळ मागितला होता. त्यामुळे ३ जूनपर्यंत समितीने आंदोलन पुढे ढकलले होते. मात्र जुलै संपत आला असला तरी त्यावर अंबलबजावणी करण्यात आली नाही. म्हणून याच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याची माहिती विदर्भवादी नेते राम नेवले यांनी दिली.