नागपूर - भाजपची महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जनाशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आणि काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेनंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही 'सत्ता संपादन यात्रा' काढली आहे. नागपूर येथील संविधान चौकातून या यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचितने आता महाराष्ट्रात सत्ता स्थापण्यासाठी पाऊल उचलले आहे.
हेही वाचा - स्वराज्याचा इतिहास नष्ट करणाऱ्या भाजपला जनतेनेच पिटाळावे - प्रकाश आंबेडकर
भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरांनी हिरवा झेंडा दाखवून यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नागपूर मेट्रो फेल आहे. त्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांसाठी पैसे खर्च केले असते तर शेतकऱ्यांची आज ही स्थिती झाली नसती. तसेच आम्हाला सत्ता स्थापनेची संधी मिळाली तर आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिले. देशावरील आर्थिक मंदीचे संकट दूर करण्यासाठी आमच्याकडे उपाययोजना असल्याचेही ते म्हणाले.