ETV Bharat / city

नागपूरमध्ये 'अनलॉक', मात्र ग्राहकांची बाजारपेठांकडे पाठ - nagpur breaking news

दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर नागपुरात अनलॉकची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. आज (दि. 27 जुलै) बाजारपेठांमध्ये ग्राहकांची काही प्रमाणात गर्दी दिसून आली. मात्र, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पूर्वीप्रमाणे कायम होती.

nagpur
nagpur
author img

By

Published : Jul 27, 2020, 3:17 PM IST

नागपूर - दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर नागपुरात अनलॉकची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. आज (दि. 27 जुलै) बाजारपेठांमध्ये ग्राहकांची काही प्रमाणात गर्दी दिसून आली. मात्र, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पूर्वीप्रमाणे कायम होती.

नागपुरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. यास नागपूरकरांनीदेखील उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. आता बाजारपेठा उघडण्यात आल्या आहेत. परंतु, बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा अभाव असल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे वाहनांची गर्दी पाहावयास मिळाली आहे. त्याचबरोबर विना मास्क फिरणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे नियमांचे पालन फक्त बाजारपेठांपुरतेच मर्यादीत आहे का?, हा सवाल उपस्थित होत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत महारानगरपालिका व प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, शहरवासियांकडून यास काणाडोळा केला जात आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बाजारपेठांमधील नियमावलींबाबत वारंवार सूचना केल्यानंतर बाजारपेठांमध्ये सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवाय पालिका आयुक्त मुंढे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक दंडात्मक कारवाई केल्याचे सांगताच बाजारपेठांमध्ये देखील ती धास्ती दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठांबरोबरच प्रत्येक नागरिकांनी नियमांचे पालन केले, तर कोरोनाचा धोका टळेल आणि बाजारपेठा देखील पूर्णतः उघडल्या जातील. मात्र, कोरोनाबाबत शासनाने सांगितलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास सर्वांनाच यश येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.