ETV Bharat / city

नागपूर : गांधीसागर तलावात शीर, हात अन् पाय नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ - Police

गणेशपेठ पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

गांधीसागर तलाव
author img

By

Published : Jul 11, 2019, 6:29 PM IST

नागपूर- गांधीसागर तलावात हात, पाय आणि शीर नसलेला अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंद करून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

गणेश पेठ पोलीस

मृतदेह अज्ञात व्यक्तीचा असून आरोपींनी दुसऱ्या ठिकाणी त्याची हत्या केल्यानंतर त्याचे शीर धडापासून वेगळे केले. एवढेच नाही तर हात आणि पाय देखील वेगळे केले. यानंतर केवळ धड प्लास्टिकच्या पोत्यात भरून गांधीसागर तलावात फेकून दिले.

हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. यानंतर गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आरोपींनी अज्ञात व्यक्तिची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी, यासाठी मृतदेह गांधीसागर तलावात फेकून दिला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Intro:हात पाय आणि मुंडके नसलेला अज्ञात इसमाचा मृतदेह नागपूरच्या गांधीसागर तलावात आढळून आला आहे...या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंद करून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहेBody:मृतदेह अज्ञात इसमाचा असून आरोपींनी अन्य दुसऱ्या ठिकाणी त्याची हत्या केल्यानंतर त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले एवढेच नाही तर हात आणि पाय देखील वेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आरोपींनी मुंडके हात आणि पाय वेगळे केल्यानंतर केवळ धड प्लास्टिकच्या पोत्यात भरून गांधीसागर तलावात फेकून दिल्याने खळबळ उडाली आहे गणेश पोलिसांना यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी फोन करून सूचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे हे आपल्या स्टाफ सह घटनास्थळी गेल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे अज्ञात इसमाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह हा गांधीसागर तलावात फेकून दिला असल्याचा तयास पोलिसांनी बांधला असून त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम देखील पोलिसांनी सुरू केले आहे यासंदर्भात गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून मृतकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.