नागपूर - सरकार आणि परमेश्वर कधी आशीर्वाद देतील आणि कधी गायब काही नेम नसल्याचा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लावला आहे. ते आज नागपुरात आयोजित शेतकरी उत्पादक आणि कंपनी प्रतिनिधींना मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. जमीन स्तरावर कोणत्या आणि कशा समस्या आहेत. त्याची जाणीव तिथे गेल्याशिवाय होत नाही, अशी भूमिका मांडताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे.
दोन दिवसांपूर्वी मी माझ्या गावात मुक्कामाला होतो. माझी पत्नी शेती बघते. ती म्हणाली तुमच्या विजेच्या पंपाला दिवसभर वीज नाही, त्यामुळे शेतीला सिंचन करायचे असेल तर दिवसभर वीज नाही. त्यावर मी म्हणालो की सरकार आणि वीज मंडळावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, सर्व पंप सोलर वर करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकार आणि परमेश्वर कधी आशीर्वाद देतील आणि कधी गायब काही नेम नसल्याचा टोला त्यांनी लावला आहे. ते आज नागपुरात आयोजित शेतकरी उत्पादक आणि कंपनी प्रतिनिधींना मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. वनामती सभागृहात आयोजित विदर्भ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होत. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गडकरी यांनी आपल्या शेतातला विजेचा किस्सा सांगितला.
हेही वाचा - Deputy CM Devendra Fadnavis पावसाळी अधिवेशन संपताच शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत सुरू होईल