ETV Bharat / city

Nitin Gadkari : देशात पाण्याची नव्हे तर पाण्याच्या नियोजनाची कमी - नितीन गडकरींनी शरद पवारांचा काढला चिमटा

नदीजोड प्रकल्पातून एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेले तर क्रांती होईल. तसेच्या पाण्याचा प्रश्न जा संपूर्ण देशाचा नसून काही राज्यातील आहे. पण योग्य नियोजन केल्यास मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फायदा सिंचन क्षेत्रात होईल असेही गडकरी बोलताना ( Nitin Gadkari on water planning ) म्हणाले.

Nitin Gadkari
नितीन गडकरींनी शरद पवारांचा काढला चिमटा
author img

By

Published : Jul 15, 2022, 9:37 PM IST

नागपूर - आपल्या देशात पाण्याची कमी नाही, तर पाण्याचा नियोजनाचा अभाव आहे. नदीजोड प्रकल्पातून एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेले तर क्रांती होईल. तसेच्या पाण्याचा प्रश्न जा संपूर्ण देशाचा नसून काही राज्यातील आहे. पण योग्य नियोजन केल्यास मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फायदा सिंचन क्षेत्रात होईल असेही गडकरी बोलताना ( Nitin Gadkari on water planning ) म्हणाले. तसेच कृषी क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात संशोधन झाले नसल्याचे म्हणत केंद्रित मंत्री नितीन गडकरी यांनी कानही टोचले. ते वसंतराव देशपांडे सभागृहात डॉ. सी. डी. मायी पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.

सीडी मायी कृषी पुरस्कार - देशात मोठ्या प्रमाणात धान्य हे सरकारच्या गोडावूनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, तांदूळ या पारंपरिक पिकाऐवजी पीक पद्धती बदलली गेली तर शेतकर्‍याचे आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होईल असे म्हणाले. पण याचवेळी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी देशाचे कृषीमंत्री असतांना एक वेळी गहू हा आयात करावा लागला अशी परिस्थिती असताना त्यांनी देशात सर्वाधिक कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सीडी मायी कृषी पुरस्कार समारंभात गडकरी बोलत होते. कृषी क्षेत्रात संशोधन व अभ्यास करणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे यांना या पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, डॉ. सी. डी. मायी, माजी मंत्री सुनील केदार, हर्षवर्धन देशमुख, डॉ. गिरीश गांधी, डॉ. विकास महात्मे, डॉ. चारुदत्त मायी, माजी मंत्री रमेश बंग उपस्थित होते.

सर्वाधिक फोकस विदर्भ आणि मराठवाड्याने करण्याची गरज - कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधन शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भोंगळे यांनी केले आहे. या विषयाची ताकद किती आहे, हे आपल्याला माहीतच नाही. शेतीच्या क्षेत्रावर किती जास्त फोकस करता येऊ शकते. विदर्भात कमी उदाहरण सापडतील. आगामी काळात पाणी हाच कळीचा मुद्दा आहे. देशात 50 टक्के सिंचन झाले तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यामुळे सिंचनावर सर्वाधिक फोकस विदर्भ आणि मराठवाड्याने करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

शरद पवारांनी केला अनुभव शेअर - कृषी क्षेत्राचे उत्पादन म्हणजेच शेतकर्‍याचे उत्पादन वाढले पाहिजे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन, अभ्यास करून व यशस्वी अनुभवाचा शेतकर्‍यांना फायदा करून द्यावा. शेतकर्‍याला एकरी 20 क्विंटल कापूस व्हावा या दृष्टीने कृषी विद्यापीठांनी संशोधन करावे. उत्पादन खर्च कमी होईल उत्पादन वाढविण्याची गरज आहे. डॉ. मायी यांनी अनेक वर्षे शेती क्षेत्रात काम केले आहे. कापसावर त्यांनी संशोधन केले. मायी हे शेती विषयांचे काम माझ्यासोबत करत होते. त्यांना मी एकदा विचारले नागपूरला जायचे का? 5 हजार कृषी शास्त्रज्ञांच्या जागा खाली होत्या. मग शेती कशी सुधारणार असा प्रश्न माझा समोर आला. त्याचावर ही जवाबदारी सोपवली. त्यांनी एक संस्था तयार करून त्यात 5 हजार शेती शास्त्रज्ञ आम्ही मायी यांच्या मार्फत तयार केले आणि त्यातून मोठे काम झाले. मी कृषी मंत्री असताना माझ्या समोर एक फाईल आली की गावातील पुरवठा करण्यात येणार गहू संपत आला. तो अमेरिकेतून आयात करावा लागला. फाईल राखून ठेवली मात्र मनमोहन सिंग यांनी ती गरज असल्याचे सांगितले आणि मला ती फाईल क्लिअर करावी लागली. मात्र त्यानंतर आपल्या देशात संशोधन सुरू केले आणि मोठ्या प्रमाणात देशात सर्वाधिक गहू साठवण्यात देशाला अव्वालस्थानी पोहोचवतात. या देशाची गरज भागवायची असेल तर पाण्याचे संचयन केले पाहिजे ते पाणी शेतकऱ्यांना पर्यंत पोहचविले पाहिजे. वैज्ञानिकानी कृषी क्षेत्रात ज्या प्रमाणे काम केले त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा केले असेही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणालेत.

हेही वाचा - Sharad Pawar Criticized Shinde Government :...तर मी शिंदे सरकारचं अभिनंदन केलं असतं - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.