ETV Bharat / city

नागपूर जिल्ह्यात २४ तासात दोन हत्या, दोन्ही घटनेतील आरोपींना अटक - नागपूरमध्ये दोन खून

गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात मिळून दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका पंधरा वर्षीय विधिसंघर्ष बालकाने मलकीयतसिंग जसबिरसिंग या तरुणाच्या छातीत कैची मारून हत्या केली आहे. तर दुसरी घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसावाडी परिसरात एका विवाहित महिलेचा खून झाला आहे.

Two murders in 24 hours in Nagpur district
नागपूर जिल्ह्यात २४ तासात दोन हत्या
author img

By

Published : Oct 7, 2021, 9:33 PM IST

नागपूर : गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात मिळून दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका पंधरा वर्षीय विधिसंघर्ष बालकाने मलकीयतसिंग जसबिरसिंग या तरुणाच्या छातीत कैची मारून हत्या केली आहे. तर दुसरी घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसावाडी परिसरात एका विवाहित महिलेचा खून झाला आहे. ही महिला मध्यप्रदेशच्या शिवानी येथे राहत असून ती आई वडिलांना भेटण्यासाठी सिरसावाडी येथे आली होती. त्याच परिसरात रहाणाऱ्या अमलेश कुमार या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. आरोपी अमलेशला पोलिसांनी अटक केली आहे.

पहिली घटना:- नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा दिपसिंग नगर येथे हत्येची पहिली घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी हा विधिसंघर्ष असून त्याचे वय केवळ १५ वर्ष आहे. आरोपी हा मृतक मलकीयतसिंग जसबिरसिंग यांचा परिचीत होता. आरोपी आणि मृताकांत कुठल्यातरी कारणावरून वाद झाला तेव्हा आरोपीने मृतकाच्या घरातील कैचीने मलकीयतसिंग जसबिरसिंग यांच्या छातीवर जोरदार वार केला,ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तो पर्यंत मलकीयतसिंग जसबिरसिंग यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दुसरी घटना:- नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसावाडी येथे हत्येची दुसरी घटना घडली आहे. आई वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या पंचवीस वर्षीय विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यापूर्वी आरोपीने महिलेवर अतिप्रसंग केल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. सिरसावाडी परिसरात सिमेंटचे पाईप तयार करणारी एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये आरोपी अमलेश कुमार शंभू मंडल आणि मृतक महिलेचे आई वडील कामाला आहेत. बुधवारी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त कंपनीत गेले असताना महिला एकटीच घरी होती. त्यावेळी आरोपीने संधी साधून घरात प्रवेश केला, त्यानंतर आरोपीने महिलेचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.