नागपूर - शहरात कोरोनाची लागण झालेले ४ रुग्ण आहेत. यापैकी २ अमेरिका १ दुबई आणि एक अमेरिकेवरून आलेल्या रुग्णाची पत्नी अशी एकूण चार रुग्ण आहेत. चीन, जपान, कोरिया, इराण, इराक, इटली, स्पेन या ७ देशातून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. मात्र, या देशांच्या यादीत वाढ झाली असून दुबई, सौदी अरेबिया आणि युएसए या देशातून येणाऱ्या प्रवाशांना देखील विमानतळावरून आधी विलगीकरन कक्षात ठेवण्यात येईल.
महाराष्ट्रात येणारे रुग्ण हे या देशातील असल्या मुळे राज्य शासनाणी हा निर्णय घेतलाय, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली. कोरोनाला घाबरून न जात जनतेनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.