नागपूर - रेल्वे पोलिसांनी चेन्नई-निझामुद्दीन एक्स्प्रेस ही नागपूर रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री एक तासाहून अधिक काळासाठी थांबविली होती. या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याची अज्ञाताने रेल्वे पोलिसांना कळविले होते.
रेल्वे पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांनी श्वानपथकासह चेन्नई-निझामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये संशयित बॉम्बचा शोध घेतला. त्यासाठी ही रेल्वे पावणेनऊ वाजता थांबविण्यात आली होती. रेल्वेत संपूर्ण तपासणी केल्यानंतर बॉम्ब अथवा संशयित वस्तू आढळली नाही. त्यानंतर पुढील प्रवासासाठी रेल्वे रात्री १० वाजता सोडण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेत बॉम्ब असल्याने धोका असल्याचे अज्ञात व्यक्तीने पुणे रेल्वे पोलिसांना कळविले होते. हा संदेश पुढे नागपूर पोलिसांना पाठविण्यात आला. त्यानंत रेल्वेची तपासणी करण्यात आली. ती माहिती खोटी असल्याचे आढळून आले.
हेही वाचा-महाविकासआघाडीचा भाजपला शह; विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती लांबणीवर
रेल्वे पोलिसांना तपासणीदरम्यान झाशीमधून प्रवास करणारे चार व्यक्ती आढळून आले. त्यांच्याकडे १० किलो युरिया होता. ते प्रवासी हे आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथील युरिया कंपनीत काम करतात. त्यांची चौकशी केली असता समाधनकारक उत्तरे मिळाल्याने त्यांना सोडून दिल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा-भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांचे महाआघाडीच्या बाजूने मतदान, म्हणाले...