ETV Bharat / city

Mohan Bhagwat : भारतातील व्यापार नफ्याचे साधन नसून सहकारातील तपश्चर्या - मोहन भागवत - नागपूर येथील सहकार कार्यक्रम

जगातील देश व्यापाऱ्याला नफ्याचे साधन मानतात. पण भारत जीवनाच्या गरजेच्या आधारावर व्यापार निर्माण करतो ही एक सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेली तपश्चर्या असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत. (Mohan Bhagwat At the event in Nagpur) ते नागपूरात सहकार भारतीच्या 'सिम्पली देसी' या स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी धरमपेठ येथील आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत
author img

By

Published : Mar 4, 2022, 10:03 AM IST

नागपूर - भारतीय उद्योगाची संकल्पना वेगळी आहे, पाश्चिमात्य देशाची संकल्पना वेगळी आहे. जगातील देश व्यापाऱ्याला नफ्याचे साधन मानतात. पण भारत जीवनाच्या गरजेच्या आधारावर व्यापार निर्माण करतो ही एक सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेली तपश्चर्या असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत. (Mohan Bhagwat In Nagpur) ते नागपूरात सहकार भारतीच्या 'सिम्पली देसी' या स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी धरमपेठ येथील आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

यातून समाज उभा राहू शकत नाही

पूर्वी आयात करणे याला प्रतिष्ठा आणि महत्व मानायचे. पण आता स्वच्या माध्यमातून सहकारामध्ये आपण जोडले जात आहोत. पण सहकारामध्ये स्वार्थने जोडले तेव्हा उन्नती ऐवजी अधोगती होते. तसेच, यातून समाज उभा राहू शकत नसल्याचे मतही सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यामुळे सर्व समाजाची संवेदना मनात अनुभत करून जो व्यक्ती समाजाला बांधण्याचे काम करतो. सहकार भरती ही एक तपश्यर्या आहे असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहे.

सर्वांना सोबत घेऊन सहकार पद्धतीने काम करणारी भारतीय संस्कृती

देश आर्थिक स्थरावर बलवान होतो तो उद्योजकतामुळे. पश्चिमी देशाचे अर्थयंत्र पाहिल्यास ते समाजाच्या उद्योगजगताला महत्व देत नाही. त्यांना समाजाकडून श्रम शक्ती पाहिजे पण त्यांना मालकी द्यायची नसते. कॉर्पोरेट काही लोक केंद्रित पद्धतीने नफा कमवतात. बाकी, लोकांना स्वतःच्या आजीवेकेसाठी काम करावे लागते. पण भारतीय परंपरेत असे होत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन सहकार पद्धतीने काम करणे ही खरी संस्कृती आहे. सहकार पद्धतीने सर्व समूहाला सोबत बांधून काम करण्याचे स्वातंत्र्य भारताने दिले आहे. पण हे स्वतःला मोठे करत नसून सर्वांना सोबत घेऊन त्यांना मोठे करण्याचे काम करत आहे. आपल्या भारतात सूक्ष्म आणि लघु उयोजकांच्या माध्यमातून झोपड्यांमध्ये उद्योजकता निर्माण होत आहे. हे सहकाराची ताकद असल्याचही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

जागतिक बाजारपेठ आणि भारतावर बोलले सरसंघचालक

जागतिक बाजारपेठेवर बोलताना सरसंघचालक म्हणाले की, जगाची ज्या पद्धतीने व्यवसाय करण्याची पद्धती आहे त्याच पद्धतीने आपल्याला आचरण करून बाजारात उतरावे लागणार आहे. आपली उत्पादने जागतिक बाजारपेठेत नेताना 'सिम्पली देशी' सारख्या आधुनिक नावाने उतरणे आजच्या काळाची गरज आहे. भारतात उद्योजकाचा विश्वासावर उभे करायचे आहे. पण हा उद्योजक कोण असणार याचे उत्तर स्वामी विवेकानंद देऊन ठेवले आहे, ते म्हणतात सामान्य सुतार-लोहार, भडभुंज अशा छोट्या घटक उद्योजक असणार आहे. याच छोट्या उद्योजकामुळे भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. देशाला संस्कार देणारा हा उपक्रम सहकारच्या मध्यातून घडत आहे. आपल्या जीवनात आनंद मिळवण्यासोबत इतरांचे आयुष्य सुखमय करत आहे असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा - HSC Exam : आजपासून बारावीची परीक्षा सुरू; १४ लाख ८५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.