नागपूर - नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. मागील काही दिवसात वाढती कोरोना चाचण्यांची संख्या पाहता नागपूर जिल्ह्यात बुधवारी 1710 जण बाधित आढळून आले असून, शहरात 1433 नवे कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता मागील काही आठवड्याच्या तुलनेत एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झालेली आहे.
नागपूर शहरात मागील 24 तासात 6954 जंणाची आर्टिपीसीआर आणि अँटिजेन कोरोना चाचणी अहवालात 1433 नवे रुग्ण मिळून आले आहे. यात ग्रामीण भागात 3504 जणांचा चाचणी अहवालात 275 जण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. यात एकूण 10 हजार 485 कोरोना चाचणीत 1433 रुग्णाची भर पडली आहे. यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही 12 हजार 166 वर जाऊन पोहचली आहे. यात आठ जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात असून 3 शहर, 3 ग्रामीण आणि दोन बाहेर जिल्ह्यातील रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - जळगावात कोविड सेंटरमध्ये रुग्णाने आणल्या मद्याच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या
पूर्व विदर्भात आज कोरोना बधितांची रुग्णसंख्या जवळपास मंगळवारच्या तुलनेत एक हजाराने वाढली असून बधितांचा आकडा 2 हजार पार गेला आहे. 2154 कोरोना बाधित पूर्व विदर्भात मिळून आले असून नागपूरात 8 तर आणि वर्ध्यात 3 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. नागपूर नंतर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात दैनंदिन बाधितांची रुग्णसंख्या वाढतीवर आहे.
नागपुरात 1433 नवे कोरोना बाधित रुग्ण मिळाले असून 947 जणांना सुट्टी झाली आहे. भंडारा 37 बाधित असून 22 जण कोरोनामुक्त झाले आहे. चंद्रपूरात 63 जण नवीन बाधित मिळून आले असून 27 जण कोरोनातून बरे झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून यात 11 जण नवीन बाधित असल्याचे पुढे आले आहे. वर्ध्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. यात 285 नवीन बाधितांची भर पडली असून 133 रुग्ण हे बरे झाले आहे. तेच गडचिरोली जिल्ह्यात 31 रुग्ण हे कोरोना बाधित असल्याचे चाचणी अहवालातून पुढे आले असून 1171 जण कोरोमुक्त झाले आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंग