ETV Bharat / city

नागपूर एसीपी कार्यालयात दारू आणि मटणाची पार्टी; तीन पोलीस कर्मचारी निलंबित - Three police personnel suspended

लकडगंज येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात दारू आणि मटणाची पार्टी केल्याने तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीसीपी लोहित मतानी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

nagpur police
दारू आणि मटणाची पार्टी करणारे तीन पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Mar 19, 2021, 9:47 PM IST

Updated : Mar 19, 2021, 10:09 PM IST

नागपूर - गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी विविध कारणांनी वादात अडकल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आज पुन्हा तीन कर्मचारी निलंबित झाल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लकडगंज येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात दारू आणि मटणाची पार्टी केल्याने तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीसीपी लोहित मतानी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

नागपूर एसीपी कार्यालयात दारू आणि मटणाची पार्टी

हेही वाचा - Antilia Explosives Scare : फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल, एनआयएकडून जप्त गाड्यांची तपासणी सुरू

नागपुरच्या शांती नगर परिसरात असलेल्या लकडगंज साहायक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात चार पोलिसांनी चक्क दारू आणि मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कार्यालयातील सर्व कर्मचारी घरी गेल्यावर या कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी केली. सध्या या पार्टीची पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे पार्टी करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० मार्च रोजी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. एका प्रकरणातील तक्रारदाराला त्याचे काम करून देण्याचे आश्वासन देऊन या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून पार्टी उकळली होती, त्यावेळी त्या तक्रारदाराने संपूर्ण पार्टीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉड केला होता. पार्टी दिल्यानंतर देखील या चारही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तक्रारदाराचे काम करून देण्यास टाळाटाळ केली असता त्यांनी सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात रंगलेल्या दारू आणि मटण पार्टीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

व्हायरल व्हिडिओची तपासणी होणार -

हा व्हिडिओ १० मार्च रोजीचा असल्याचे डीसीपी लोहित मतानी यांनी सांगितले आहे. हा व्हिडिओ रात्रीचा आहे की दुपारचा आहे ते अजून कळलेलं नाही, त्यामुळे व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी व्हिडिओ सायबर सेलकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याबाबतची अधिकृत माहिती मिळेल पण अशाप्रकारचे कृत्य यापुढे कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी करू नये म्हणूनच तीन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची प्रतिक्रिया डीसीपी मतानी यांनी दिली आहे.

निलंबनाचा दणका

आठ दिवसात पोलीस दलातील दहा अधिकारी आणि कर्मचारी निलंबित झाले आहेत. गेल्या आठवड्यात नागपूर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांसह, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. त्यातच आता या व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस दलाची प्रतिमा आणखीनच मलीन झाली आहे.

हेही वाचा - Antilia Explosives Scare : 'वाझेंना अंबानीकडून हजारो कोटींची वसूल करायची होती खंडणी'

Last Updated : Mar 19, 2021, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.