नागपूर - बोलेरो आणि दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तिघांचा ( Bolero two wheeler accident ) मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात जुनोना फुके गावाजवळ घडला आहे. मृतात महिलेचाही समावेश आहे.
दुचाकीवरून तिघे मध्यप्रदेशातील नातेवाईकांच्या घरून नागपूर जिल्ह्यातील गावाकडे परत येत होते. लग्नाचा वऱ्हाड घेऊन निघालेल्या बोलेरोने समोरून येणाऱ्या दुचाकीला ( bike Bolero Nagpur accident ) धडक दिली. रविवारी संध्याकाळी हा ( Nagpur Sunday accident ) अपघात झाला आहे.
हेही वाचा-रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यामध्ये एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाला. लग्न आटोपून रामचंद्र नेहारे, रंजना नेहरे व त्यांचा भाचा रोशन मुंगभाते हे गावाकडे परत येत होते. यावेळी प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोलेरोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तिघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले आहेत. या भीषण धडकेत दुचाकीचा चुराडा झाला. अपघातात बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलरो रस्त्याच्या कडेला गेली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत चालकांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले.
हेही वाचा-Two Died in a Road Accident : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, दोघांचा मृत्यू
हेही वाचा-Road Accident in Jodhpur : ट्रक-बोलेरोचा अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
हेही वाचा-Bus Accident : लग्नासाठी गावी चाललेल्या खासगी बसला अपघात, 25 जखमी