ETV Bharat / city

Smuggling Gold: दुबईमार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; नागपूर पोलिसांची कारवाई - दुबईमार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

नागपूर शहर पोलिसांनी दुबईमार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. (Smuggling Gold) दुबईमार्गे देशभरात सोन्याची तस्करी करणाऱ्यांसाठी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवा पर्याय म्हणून समोर आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सोने तस्करीमध्ये राजस्थानच्या नागौर येथील रॅकेट कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 7, 2022, 5:35 PM IST

Updated : Sep 7, 2022, 6:05 PM IST

नागपूर - नागपूर शहर पोलिसांनी दुबईमार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. (Three arrested for smuggling gold through Dubai) दुबईमार्गे देशभरात सोन्याची तस्करी करणाऱ्यांसाठी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवा पर्याय म्हणून समोर आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सोने तस्करीमध्ये राजस्थानच्या नागौर येथील रॅकेट कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माहिती देताना अमितेशकुमार

पार्कींग लाॅटमधून ताब्यात घेतले - सोनं, मोबाईल आणि महागड्या वस्तू भारतात आणताना कस्टम ड्यूटी भरावा लागतो. मात्र, कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी दुबईत काम करणाऱ्या गरीब कामगारांचा उपयाेग केला जात आल्याची शक्यता पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. नागपूर पोलिसांनी विमानतळावर पाळत ठेवून तिघांना पार्कींग लाॅटमधून ताब्यात घेतल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

लोखंडी हथोडीत सोनं - नागपूर विमानतळाच्या पार्किंग मधून तिघांना संशयाच्या आधारावर अटक केली. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये लोखंडी हथोडीतसह अनेक प्रकारचे साहित्य आढळून आले आहे. या वस्तू कुठून आणल्या याबाबत आरोपी ठोस माहिती देऊ शकले नाही. पोलिसांनी हथोडीची तपासणी केली असता ३४८ ग्रॅम सोने आढळून आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी याआधी दरोड्यांच्या गुन्हात सहभागी होते अशी महिती पुढे आली आहे.

सोनं, मोबाईल तस्करीची कार्यपद्धती - दुबई व शारजा आदी ठिकाणी गेलेले नागौर येथील कामगार परत येताना मोठ्या बॅगा घेऊन येतात. या बॅगांमध्ये लपवून सोनं आणि मोबाईलसह महागड्या वस्तू आणल्या जातात. या रॅकेटमध्ये सक्रिय असलेले काही आरोपी ती बॅग कामगारांकडे देतात. विमानतळाच्या पार्कींग लाॅटमध्ये हे कामगार बॅगांची अदलाबदली करतात. एवढेचं नाही तर या कामगारांजवळ नागपूर विमानतळावर कोणाला बॅग द्यायची त्याचे छायाचित्र असते. ते छायाचित्रात असलेल्या व्यक्तीची ओळख पटवून बॅग दिली जाते.

Last Updated : Sep 7, 2022, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.