ETV Bharat / city

अपक्षाला मदत करायला सांगणे हे काॅंग्रेसचे दुर्दैव- आ. दटके, भोयर म्हणतात उमेदवार मीच - आ. प्रवीण दटके

दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करुन (importing candidates) त्याला उमेदवारी द्यायची आणि बूमरँग होतांना दिसताच अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगणे हे काॅंग्रेसचे दुर्दैव (misfortune of the Congress) आहे अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके (MLA Praveen Datke) यांनी केली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र उर्फ छोटू भोयर (Congress candidate Chhotu Bhoyar) यानी सकाळी माध्यमांशी बोलतांना मीच उमेदवार आहे, भाजप बंदनामी करत आहे असे म्हणत भाजपवर पलटवार केला आहे.

Datke
आ. दटके
author img

By

Published : Dec 8, 2021, 4:57 PM IST

Updated : Dec 8, 2021, 5:51 PM IST

नागपूर: नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाला तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यातच काँग्रेस, उमेदवार बदलवत असून अपक्ष असलेल्या मंगेश देशमुखांचे नाव समोर येत असल्याची चर्चा आहे. पण असे जर होणार असेल तर काँग्रेससारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे हे दुर्दैवच म्हणण्याची वेळ आहे. कारण मोठा काळ भाजप आणि संघात निष्ठावंत असलेले छोटू भोयर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देणे, त्यानंतर त्यांना उमेदवारी देणे. पण एन वेळी अपक्ष असलेल्या मंगेश देशमुख चे नाव घेणे धक्कादायक आहे असे आमदार दटके यांनी म्हणले आहे

आ. दटके यांची प्रतिक्रिया

भाजप नगरसेवकच 'त्या' उमेदवाराचा सूचक
धक्कादायक म्हणजे विधानपरिषदेत अपक्ष असलेला उमेदवार मंगेश देशमुख यांनी अपक्ष म्हणून नामांकन भरले असले तरी त्यांच्या अर्जात तीन पक्षाचे नगरसेवक हे सूचक आहेत. भाजपसह बीएसपी आणि काँग्रेसचे सूचक असणारा तो उमेदवार आहे. त्यामुळे जर भाजपच्या नगरसेवकांचे नाव ज्याच्या सूचकमध्ये तो उमेदवार कसा असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. छोटू भोयर हे उमेदवार नाहीत तर मग मंगेश देशमुख हे काँगेसला उमेदवार म्हणून चालतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चर्चेशी आमचे काही देणे घेणे नाही. आम्ही कुठली तक्रार ही करणार नाही. असे म्हणत त्यांनी भोयर यांना टोला लगावला.

निवडणुकीत काँग्रेस अडचणीत....
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषदे निवडणुका बिनविरोध होत असतांना नागपूरात मात्र बिनविरोध झाली नाही. किंवा काँग्रेसनेही तसा कुठला प्रस्ताव न देता ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यात बीएसपीने बहिष्कार टाकला, यात एकीकडे भाजपमधून आयात केलेला उमेदवार आणि दुसरा भाजपचा नगरसेवक सूचक असलेला उमेदवार आहे, त्यामुळे याचा काँग्रेसने विचार करावा, काँग्रेसची स्थिती बिकट आहे हेच या चर्चांतून पुढे येत असल्याचेही आमदार दटकेनी स्पष्ट केले.

बदनामी करणाऱ्याचे नाव घ्यावे....
भाजप बदनामी करत आहे असा आरोप काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर करत आहेत, यावर आमदार दटके म्हणाले की त्यांनी कोण बदनामी करत आहे हे नाव घेऊन सांगावे, त्यामुळे याचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे, यातून काँग्रेस पक्षात एक वाक्यता असती तर दुसऱ्या पक्षातील उमेदवार घेण्याची वेळ आली नसती असे म्हणत काँग्रेसच्या उमेदवार निवडीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत कॉंग्रेसच्या नेत्यावरही दटके यांनी टीका केली.

हेही वाचा - Vidhan Parishad Election 2021 : सहलीला गेलेले भाजपाचे 'ते' नगरसेवक नागपुरात परतले

Last Updated : Dec 8, 2021, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.