नागपूर - कथित माओवादी प्रा.साईबाबा हे नागपूर कारागृहात असून त्यांना कोरना झाला होता. यावर त्यांची पत्नी वसंता कुमारीने त्यांना पॅरोलवर सोडण्यात यावे, त्यांचावर खासगी रुग्णालयात उपचार करावा, अश्या आशयाचे पत्र मुख्यमंत्री यांना लिहले होते. यावर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते पत्र-
दिल्लीचे प्रा. साईबाबा व डॉन अरुण गवळी यांच्यासह अन्य काही लोकांना कोरोना झाला होता. यावेळी त्यांना नागपूरच्या कारागृहात आतमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यात त्यांचा प्रकृतीचा तपासणीसाठी त्यांना वैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले होते. यामुळे त्यांच्या प्रकृतीचीच्या बाबतीत काळजी व्यक्त करत प्रा.साईबाबा यांची पत्नी वसंता कुमारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.
यात त्यांना योग्य उपचार मिळावा म्हणून खासगी रुग्णालयात भरती करण्यात यावे. त्यांना पॅरोलवर सुट्टी देण्यात अशी, विनंती पत्रातून केली होती. दरम्यान, जेल प्रशासन त्यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तरे देताना सांगितले.
हेही वाचा- सेलिब्रिटी ट्विट चौकशी प्रकरणाबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला - गृहमंत्री