ETV Bharat / city

मुंबईत दहशतवादी पकडले जाणे म्हणजे राज्याच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे, त्यामध्ये एका मुंबईतील टॅक्सी चालकाचा समावेश आहे. पकडण्यात आलेले दहशतवादी देशातंर्गत अनेक भागात दहशतवादी कृत्य करण्याची तयारी करत असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
author img

By

Published : Sep 15, 2021, 4:56 PM IST

नागपूर - दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे, त्यामध्ये एका मुंबईतील टॅक्सी चालकाचा समावेश आहे. पकडण्यात आलेले दहशतवादी देशातंर्गत अनेक भागात दहशतवादी कृत्य करण्याची तयारी करत असल्याचा खुलासा झाला आहे. या घडामोडींवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातंर्गत दहशतवादी पकडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विशेषत: मुंबईत दहशतवादी पकडले जाणे ही राज्याच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

देशात राहून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अशा लोकांना संपवलेच पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दहशतवादी बनून घुसखोरी करीत दडून बसलेल्यांना हुडकून काढणे खूपच गरजेचे आहे. देशात परत दशतवादी घटना घडू द्यायच्या नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस
सहापैकी एक दहशतवादी मुंबईचा -
दिल्लीत मंगळवारी पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचे आढळून आले आहे. जान मोहम्ममद शेख असे या आरोपीचे नाव आहे. शेखला अटक करण्यात आल्यानंतर धारावी पोलिसांनी रात्रीच त्याची पत्नी आणि दोन मुलींना ताब्यात घेतले आहे. त्यांची अतिशय कसून चौकशी केली जाणार आहे.

हे ही वाचा -यापुढे ओबीसी जनता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही - बावनकुळे

कोण आहे जान मोहम्मद अली शेख?

जान मोहम्मद अली शेख सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. सायन येथील तो फार जुना रहिवाशी आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण या घरात राहत होते. मुंबईच्या धारावीमध्ये जान मोहम्मदच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, जान मोहम्मदनं तीन दिवसांपूर्वी आमच्यासोबत चहा घेतला. तो स्वभावानं चांगला होता. ड्रायव्हर म्हणून काम करत होता. जान मोहम्मद धारावी परिसरात बऱ्याच वर्षांपासून राहत होता.

हे ही वाचा- आंदोलनाची नौटंकी करून भाजपला आपले पाप झाकता येणार नाही, हिंमत असेल तर मोदींविरोधात आंदोलन करा - पटोले

मुंबईची लोकल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर -

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. असी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच घातपाताचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.