नागपूर - नागपूरात कोरोनाच्या परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यात जीवनदायी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने तुटवडा निर्माण होत आहे. मात्र, काळाबाजारी करणारे संधी साधू 25 हजारांपर्यंत इंजेक्शन विकत आहेत. रेमडेसीवीर इंजेक्शन ब्लॅकमध्ये कामठी परिसरात विकले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. यात हस्तक (पंटर) पाठवून कारवाई करण्यात आली. यात एक डॉक्टर आणि तीन ब्रदर्स यांना अटक करत 15 इंजेक्शन जप्त केले आहेत.
नागपूरात एकीकडे रुग्ण अक्षरशाह मृत्यूशी झुंज देत आहे. याच्यातही पैसे कमावण्याच्या नादात काही जण माणुसकी हरवून रेमडेसिवीरच्या नावाने काळाबाजार करत आहे. पोलीस आयुक्त यांना याबद्दलची माहिती मिळाली असता हस्तक पाठवत डॉ लोकेश शाहू यांना फोन करून इंजेक्शनची गरज असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये 1 हजारात मिळणाऱ्या इंजेक्शनसाठी 16 हजार रुपये मागण्यात आले. यात डिल ठरली. एका ठिकाणी हे इंजेक्शन घेऊन येतांना डॉ. लोकेश मोहिते (25), यात स्वास्थम रुग्णालयातील वार्डबॉय शुभम मोहूडरे (26), हे दोघे ड्रॅगन पॅलेस परिसरात दोन इंजेक्शन घेऊन पोलिसांच्या सापड्यात अडकले.
15 वेगवेगळ्या कंपनीचे 15 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त-
यात चौकशी केली असतांना स्वास्थम रुग्णलयातील वार्डबॉय कुणाला कोहळे (23) याच्याकडे इंजेक्शन मिळाले होते. त्याच्याकडून सुद्धा 7 इंजेक्शन जप्त करत अटक करण्यात आली आहे. यावेळी ते इंजेक्शन शालिनीताई मेघे हॉस्पिटलचा वार्डबॉय सुमित बांगडे (23) याच्याकडून पुरवण्यात आले असल्याने समजले. त्याच्याकडूनही 6 इंजेक्शन जप्त करत त्यालाही कामठी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात दोन मोठ्या रुग्णालयाची नावे पुढे आले आहेत. या पद्धतीने चौघांनाही पकडण्यात आले असून 15 वेगवेगळ्या कंपनीचे 15 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त करत पुढील चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिली.
यामध्ये 15 इंजेक्शन जप्त-
कारवाईत तीन वेगवेगळ्या कंपन्यांची एकूण 15 रेमडेसिवीर इंजेक्शन ज्याची अंदाजे किंमत 63,000 इतकी आहे. दोन मोटार सायकल 1लाख 11 हजार, चार मोबाईल 46,000 संपूर्ण कारवाईमध्ये 2 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या माहितीमध्ये 4 जणांना अटक केली आहे. नागपुरातील स्वास्थम आणि शालाईनताई मेघे रुगणालयातील वार्ड बॉयकडे हे इंजेक्शन सापडे आहेत. यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे. हे इंजेक्शन त्यांनी कुठुन मिळवले. हे विक्रीचेन कश्या पद्धतीने काम करत आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
या कारवाई परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त निलोतपाल यांच्या नेतृत्वात विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी पथकासह जाऊन ही सापळा रचून ही कारवाई केली. यामध्ये अन्न प्रशासन विभागाचे सुरज भारती, दिनेश यादव, चेतन जाधव, रविंद्र राऊत यांनी यशस्वी केली. तसेच अन्न व औषध प्रशासन नागपूरच्या औषध निरीक्षक श्रीमती स्वाती भरडे यांनी सुध्दा कारवाईमध्ये भाग घेतला होता.
हेही वाचा - खळबळजनक! कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार