नागपूर : काँग्रेसने दोन मत अधिक घेतले, असे प्रफुल पटेल यांच्या विधानाशी असहमती दर्शवत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी असे काही झाले नसावे. आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच कोटा ठरवला होता. शेवटचे दोन मतं आमचे नक्कीच शिवसेनेला गेलेले आहे, दोन मताबद्दल सविस्तर कोणाशीही बोलणं झालेलं नाही, पण एक मत फुटले असून, ते विरोधी पक्षाचे फुटून आम्हाला मिळालेले असावे, असे महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्या नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होत्या.
विधान परिषदेसाठी नवीन रणनीती आखणार : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना एकाही अपक्षांनी शब्द पाळला नाही म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात काही अपक्षांची नाराजी व्यक्त केली, अशी विचारणा केली असता तसे काही असल्यास महाविकास आघाडीतील नेते आम्ही आम्ही सगळेजण मिळून ती नाराजी मोडून काढू, अशी यशोमती ठाकूर म्हणाल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवी रणनीती घेऊन समोर जाऊ. विरोधी पक्ष विरोधी पक्षातच राहील आणि आम्ही सत्तेत राहू, असा विश्वासही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
जातीपातीचे राजकारण करू नये : आमचे येथील यात भाजपचे नेते अनिल बोंडे हे निवडून आले. आमच्या जिल्ह्याचे आहे, माजी पालकमंत्री राहिले आहेत. चांगले आहेत, सोबत मिळून काम करू, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. जातीपातीचे राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा : Yashomati Thakur : नवनीत राणांनी बेशर्मीची हद्द गाठली; यशोमती ठाकूरांची बोचरी टीका