नागपूर - गेल्या पाच दिवसांपासून नागपूरसह विदर्भात सूर्याचा सुरू असलेला प्रकोप आजही कायम होता. आज नागपूर हे विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. नागपुरात आज ४६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
गेल्या पाच दिवसांपासून नागपुरातील तापमान सतत ४५ अंशांच्या वर नोंदवण्यात येत आहे. सोमवारी नागपुरात ४७ अंश सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. नागपूर खालोखाल अकोला येथे कमाल ४६.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील काही दिवस उष्णतेचा प्रकोप असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आजही विदर्भातील सात प्रमुख शहरांचे तापमान ४५ अंश सेल्सियसच्या वर राहिले.
विदर्भातील प्रमुख शहरांचे आजचे तापमान
अकोला -- 46.5
अमरावती -- 45.6
बुलडाणा -- 43.0
चंद्रपूर -- 45.2
गडचिरोली -- 43.4
गोंदिया -- 45.0
नागपूर -- 46.8
वर्धा -- 46.0
वाशिम -- 43.8
यवतमाळ--45.5