नागपूर : कोरोनाचे दोन वर्षे वाया गेल्यामुळे तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नागपुरच्या जामठा क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 सामना रंगणार (T20 cricket match will be played) आहे. जामठाचे मैदान भारतीय संघासाठी लकी राहिलेलं आहे. मात्र टी-20 साठी काय (T20 cricket match VCA Stadium in Nagpur) सांगतो, विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे मैदान याचा आढावा घेणार आहे.
2009 ते 2022 दरम्यान एकूण 12 टी-20 क्रिकेट सामने जामठा मैदानावर खेळण्यात आले आहेत. यामध्ये 12 सामने पुरुषांचे आणि दोन महिलांचे टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 4 सामने भारताने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात विजय तर दोन सामने भारताने गमावले आहेत. त्यामुळेच जामठा मैदानावर भारताचा रेकॉड 50-50 असा आहे. (VCA Stadium in Nagpur)
असा आहे जामठा मैदानाचा टी-20 रेकॉड - व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर २३ सप्टेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत होणार आहे. आतापर्यंत जमठाच्या स्टेडियमवर १२ टी-२० सामने खेळण्यात आले आहेत. पहिला टी-२० सामना ९ डिसेंबर २००९ साली भारत विरुद्ध श्रीलंकाच्या संघात खेळण्यात आला होता. तो सामना श्रीलंकाने २९ धावांनी जिंकला होता. त्यानंतर ८ मार्च २०१६ रोजी झिम्बाब्वे आणि हाँगकाँग संघात सामना रंगला होता,त्यामध्ये झिम्बाब्वेच्या संघाने १४ धावांनी विजय नोंदवला होता. तिसरा सामना १० मार्च २०१६ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध स्कॉटलंड या दोन संघात खेळण्यात आला. तो सामना १४ धावांनी अफगणिस्ताने खिशात घातला (T20 cricket match will be played) होता.
चौथा सामना झिम्बाब्वे विरुद्ध स्कॉटलंड असा खेळण्यात आला. त्यामध्ये झिम्बाब्वेच्या संघाने ११ धावांनी विजय मिळवला होता. पाचवा सामना अफगणिस्तान आणि झिम्बाब्वेच्या संघात झाला, त्यामध्ये अफगणिस्तान ने ५९ धावांनी विजय नोंदवला होता. सहावा सामना हाँगकाँग विरुद्ध स्कॉटलंडमध्ये झाला यामध्ये स्कॉटलंडने ८ गडी राखत विजय मिळवला. सातवी मॅच १५ मार्च २०१६ रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या संघात खेळण्यात आली होती, त्यामध्ये न्यूझीलंडने भारतावर ४७ धावांनी विजय मिळवला. आठवी मॅच २५ मार्च २०१६ ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये झाली, त्यामध्ये वेस्ट इंडीजने ३ गडी राखून विजय नोंदवला. नववा सामना २९ जानेवारी २०१७ ला भारत आणि इंग्लंडच्या संघात खेळला गेला होता, त्यामध्ये भारतीय संघाला अवघ्या ५ धावांनी निसटता विजय प्राप्त झाला होता. तर शेवटचा सामना हा तीन वर्षांपूर्वी १० नोव्हेंबर २०१९ला भारत विरुद्ध बांगलादेशच्या संघात रंगला होता, त्या सामन्यात भारताने ३० धावांनी विजय नोंदवला होता.