ETV Bharat / city

T-1 Tiger Attack : टी-1 वाघाचा अपघात; जखमी वाघाने वाहनचालकावर केला हल्ला, वनविभागाने बेशुद्ध करून केलं रेस्क्यू

author img

By

Published : Jan 25, 2022, 8:09 PM IST

Updated : Jan 25, 2022, 10:08 PM IST

नागपूर जिल्ह्यातील चोर बावली या ठिकाणी आज (25 जानेवारी) सकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मिस्ट्री टी-1 हा वाघ जखमी (T1 Tiger Injured) झाला. तो जखमी अवस्थेत त्या ठिकाणी झुडपात लपून बसलेला होता. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला (T1 Tiger Attack on Couple) आहे. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले आहेत.

t1 tiger
t1 वाघाचा अपघात

नागपूर - अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या टी-1 नामक वाघाने (T1 Tiger Attack) महामार्गाच्या कडेला लघु शंकेसाठी थांबलेल्या पती-पत्नीवर हल्ला (T1 Tiger Attack on Couple) करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

वनविभागाने बेशुद्ध करून वाघाला केलं रेस्क्यू

वाघाच्या हल्ल्यात ते दोघेही थोडक्यात बचावले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या बचाव पथकाने जखमी वाघाचा शोध घेतला, त्यानंतर वाघाला बेशुद्ध करून सुखरूप रेस्क्यू केले आहे. त्यानंतर जखमी टी-1 वाघाला उपचाराकरिता वन विभागाच्या ट्रांजिट ट्रीटमेंटमध्ये नेण्यात आले आहे.

  • वाहनाच्या धडकेत वाघ जखमी -

नागपूर जिल्ह्यातील चोर बावली या ठिकाणी आज (25 जानेवारी) सकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मिस्ट्री टी-1 हा वाघ जखमी झाला. त्याच्या मागील डाव्या पायाला दुखापत झाली होती. वाघ जखमी अवस्थेत त्या ठिकाणी झुडपात लपून बसलेला होता. त्याचवेळी मिथिलेश तिवारी हे त्यांच्या पत्नी विमला तिवारी यांच्यासोबत पवनीकडून मनसरकडे जात होते. ते रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्याकरिता थांबले असताना लपून बसलेल्या वाघाने विमला तिवारी यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी मिथिलेश तिवारी यांच्यावरसुद्धा वाघाने हल्ला केला. या घटनेत विमला तिवारी यांच्या पायाला तर मिथिलेश तिवारी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. हल्ल्यात दोघेही थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • वाघाचे यशस्वी रेस्क्यू -

वाहनाच्या धडकेत वाघ जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत वाघाने वाहन चालकांवर हल्ला केल्याची माहिती समजताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित ॲक्शन घेत सर्व वाईल्ड लाईफच्या रेस्क्यू टीमला नागपूरवरून पाचारण केले. तोपर्यंत वाघ मात्र जंगलात निघून गेला होता. रेस्क्यू टीमने वाघाचा शोध घेतला तेव्हा त्यांना वाघ एका ठिकाणी आढळून आला. रेस्क्यू पथकाने वाघाला बेशुद्ध करून त्याचे यशस्वी रेस्क्यू केले आहे. वाघाला नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील वनविभागाच्या ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरला उपचाराकरिता नेण्यात आले आहे.

  • रेंजमधील सर्वात मोठा वाघ -

वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाचे नाव मिस्ट्री टी-1 असे आहे. हा वाघ दहा ते बारा वर्षाचा असल्याची माहिती असून, तो पेंच व्याघ्रप्रकल्पातील चोर बावली रेंजमधील सर्वात मोठा वाघ आहे.

हेही वाचा - 'टी-वन' वाघीण ठार; नवाब पिता-पुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार

Last Updated : Jan 25, 2022, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.