नागपूर - कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी उत्कृष्ट काम केले. महाविकास आघाडीचे उपक्रम राबवल्याने हे यश मिळाले असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले. नुकत्याचा पार पडलेल्या निवडणुकीत माहाविकास आघाडीला यश मिळाल्याचेही त्यांनी म्हटलं.
ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. हीच वस्तुस्थिती आम्ही मतदारांपर्यंत मांडण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून केले आणि लोकांनीही त्याला साथ दिली. यात दुसरे म्हणजे सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने जे शपथ पत्र दाखल केले, त्या ओबीसींचा इंपरिकल आहे हे मान्य केले पण डेटा देऊ शकत नाही आणि देणार नाही ही जी ताठर भूमिका घेतली. त्यामुळे ओबीसी जनतेला हे कळून चुकले की ओबीसींचे आरक्षण रद्द कोणामुळे झाले आणि मतदारांनी मतांच्या कौल देत ते दाखवून दिले,असेही मंत्री केदार म्हणाले.
बावनकुळे यांच्या आरोपवर चर्चा करण्याचे केले आवाहन
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्ता आणि पैश्याचा वापर करून कॉंग्रेसला पोटनिवडणुकीत बहुमत मिळल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना मंत्री केदार म्हणाले, की त्यांनी केलेला आरोप योग्य आहे की नाही यासाठी त्यांना माझा निरोप द्या, आम्ही समोरा-समोर बसून यावर माध्यमासमोर चर्चा करू आणि त्यातून सोक्ष-मोक्ष लावू.
लोकांचा विश्वास संपादन करायचा असतो -
आयकर विभागाच्या छापेमारीवर बोलताना सुनील केदार म्हणाले, की हेच देशाचे दुर्दैव आहे. की स्वतःचे राजकीय वजन वापरताना लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते वापरला पाहिजे, तेच लोकशाहीलाही अभिप्रेत आहे. पण राजकारणात उच्च पदावर जाण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून मतदारांचा विश्वास संपादन केका पाहिजे. पण सत्तेचा दुरूपयोग करून दुसरीकडे सत्ता मिळवण्याचा केविलवाणा प्रकार देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या 75 वर्षात कधीही पाहायला मिळाला नाही. पण असे प्रकार जास्त दिवस चालत नाही. चार दिन की चांदणी प्रमाणे असतात. फिर अंधेरी रात है, असे म्हणत मंत्री केदार यांनी ईडी, सीबीआय,आयकर विभागाच्या करवाईवर मत व्यक्त केले. यावेळी भाजपवर हल्ला चढवला. जबरदस्तीने सत्ता मिळवण्याचा हा खटाटोप असल्याचेही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जबाबदारी दिल्यास बघू
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा कृषी उत्पन्न बाजार यशानंतर शहरात येत्या काळात होऊ घातलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी नेतृत्व करावे असा सुरू आहे यावर विचारणा केली असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात त्यावर अवलंबून आहे. पण तशी जवाबदारी मिळाल्यास त्यावर काम करण्याची तय्यार असल्याचा सूर बोलण्यातून दिसून आला.
हेही वाचा - Cruise Drug Case : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला