नागपूर - रेमडेसिवीर काळाबाजारी प्रकरणात एक आरोपी फरार झाल्याप्रकरणी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. मनीष गोडबोले असे निलंबन झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव असून ते पाचपावली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
काही दिवसांपूर्वी नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन मधून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजारी प्रकरणी आरोपी उबेद राजा इकराम उल हक नामक (मेडिकल स्टोअर मालक) फरार झाला होता. पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांनी आरोपी ताब्यात असताना त्याच्याकडे नीट लक्ष घातले नाही, असे आरोप होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी आज पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले ला निलंबित केले आहे.
रेमडेसिवीर संदर्भातील खटले निकाली काढा -
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे खटले 31 मेपर्यंत निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दिले आहेत. या संदर्भातील 8 खटले मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात स्थानांतरित करून ते 31 मेपर्यंत निकाली काढण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश दिले आहेत.