नागपूर - एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयावर लक्ष वेधण्यासाठी अनोखी राखी बनविली आहे. 15 फूट उंच तर 35 फूट रुंद आकाराची राखी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
ही महाकाय राखी नागपुरातील ललिता पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनविली आहे. विद्यार्थ्यांनी ही महाकाय राखी आपल्या देशाच्या सिमांच रक्षण करणाऱ्या सैनिकांना समर्पित करण्यासाठी बनविली आहे. तिरंग्याच्या रंगात साकारलेली ही राखी पाणी वाचविण्याचा संदेश देखील देत आहे. 15 बाय 35 फूट आकाराची ही महाकायराखी भाऊ बहिणीच्या प्रेमासोबतच पर्यावरण आणि देशभक्तीचा संदेश देत असल्याने नागपूरकरांसाठी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे