ETV Bharat / city

विलगीकरण केंद्र प्रेमीयुगुलांचा अड्डा ? महिला पोलीस प्रियकरासोबत संस्थात्मक क्वारंटाईन - नागपूरमध्ये क्वारंटाईन कक्षात प्रेरप्रकरण

कोरोनाच्या संकटकाळात अनोखी प्रेमकथा समोर आली आहे. नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आलेल्या एका महिला पोलीस कर्मचारी आणि तिच्या प्रियकराच्या प्रेम कथांची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. विलगीकरण केंद्रातील या प्रेमप्रकरणामुळे महापालिका, आरोग्य विभाग आणि पोलीस सर्व थक्क झाले आहेत.

story of a love affair in nagpur quarantine center
विलागीकरण कक्षातील प्रेमप्रकरणाची कथा, खऱ्या पत्नीची तक्रार
author img

By

Published : Jul 15, 2020, 5:37 PM IST

नागपूर - एकीकडे कोरोनामुळे जग त्रस्त झालं असताना नागपुरातील एका प्रेमी युगुलाने मंदीतही संधी शोधली आहे. नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आलेल्या एका महिला पोलीस कर्मचारी आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमकथांची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. विलगीकरण केंद्रातील या प्रेमप्रकरणामुळे महापालिका, आरोग्य विभाग आणि पोलीस सर्व थक्क झाले आहेत. महत्वाचे म्हणजे त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपला नवरा असल्याचे सांगून प्रियकराला विलगीकरण केंद्रात दाखल करून घेतले. तर दुसरीकडे त्या प्रियकराची खरी पत्नी आपल्या नवऱ्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, तिला यश मिळत नसल्याने शेवटी त्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नागपूर पोलिसांच्या एका कार्यालयात एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. त्यामुळे नियमाप्रमाणे त्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यापैकी एक महिला कर्मचारीही पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन झाली. तिथे येताना ती एका पुरुषासोबत आली होती. हा पुरुष माझा नवरा असून, तो सतत माझ्या संपर्कात असून त्यालाही संक्रमणाची भीती असल्याने तो ही क्वारंटाईन होणार असल्याचे तिने सांगितले. कुटुंबातील सदस्यांना एक खोली देण्याच्या नियमाप्रमाणे विलगीकरण केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याने या दोघांना एकच खोली बहाल केली होती. दोघांच्या विलगीकरण कालावधीतले काही दिवस निघून गेल्यानंतर नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने आपला नवऱ्या दुसऱ्या महिलेसोबत क्वारंटाईन झाला असल्याची तक्रार दाखल केली. ज्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

सुरुवातीला तो चार दिवस घरी न परतल्यामुळे त्याच्या पत्नीला काळजी वाटली. तिने माहिती घेतली असता तो विलगीकरण केंद्रात दुसऱ्याच महिलेसोबत राहत असल्याचे कळले. मग, बजाजनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देत शासकीय विलगीकरण केंद्र प्रेमीयुगुलांचा अड्डा झाला आहे का? असा सवाल त्या महिलेने विचारला आहे. महिलेने केलेल्या दाव्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली. यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा तो प्रियकर असल्याचे समोर आल्यानंतर आता पोलिसांनी त्या दोघांची खोली वेगळी केली आहे. या दोघांची कार्यालये जवळ-जवळ आहेत. त्यातूनच एका सरकारी कॅम्पमध्ये दोघांची ओळख होऊन घट्ट मैत्री जुडली. आता १४ दिवस क्वारंटाईन होताना एकमेकांचा विरह कसा सोसायचा असा प्रश्न असताना दोघांनी त्यावर युक्ती काढली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.