नागपूर - डोंबिवलीत घडलेल्या सामूहिक बलात्कारची घटना संतापजनक आहे. तसेच डोंबिवलीत अशा प्रकारची घटना धक्कादायक असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. सरकारच्या गृह विभाग आणि पोलीस यंत्रणेने विशेष प्रयत्न करून, यात लक्ष घातले पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळेस दिला.
असंवेदनशील लोकांकडून अपेक्षा नाही
भाजप नगरसेविकेच्या कार्यलयात महिला विनयभंगाची गंभीर घटना आहे. पण अशी घटना घडल्यानंतर सत्तारूढ पक्षातील लोकांकडून ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली जाते. ज्या पद्धतीने इतर राज्याकडे बोट दाखवले जाते, ते पाहून ही अत्यंत असंवेदनशील घटना आहे. अशा पद्धतीने असंवेदनशील लोकांकडून मी कुठलीच आशा बाळगत नसल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले.
राज्यपालांचे काहीच वाकडं होत नाही
सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल यांच्यावर केलेली टीका ही दर्जाहीन आहे. त्यामुळे राज्यपाल पदाचा सन्मान समजून घेतला पाहिजे, त्यांच्यावर टीका करताना राज्यपाल यांनी ओबीसींच्या अध्यादेशात जी चूक लक्षात आणून दिली आणि ती सुधारावी लागली. यामुळे ही तळमळ मळमळ टिकेतून व्यक्त होत आहे. पण अश्या प्रकारची जहरी आणि घाणेरडी टीका खालच्या दर्जाची केली तर त्या टिकेतुन त्यांची प्रवृत्ती दिसते. यातून त्या राज्यपालांचे किंवा संस्थेचे काहींची वाकडे होत नाही असा सणसणीत टोला सेनेला लगावला.
हेही वाचा - सोलापुरात त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीला स्थानिक नेत्यांचा विरोध