ETV Bharat / city

'आमच्या हक्काचा पगार द्या'; नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब आंदोलन - ST worker news

गेल्या ३ महिन्यापासून थकीत असलेले वेतन आणि शासनाने लागू केलेले वाढीव वेतन लागू करा. या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून लाक्षणिक आंदोलने करत आहेत. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यानुसार आज हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले आहे.

st workers protest with family for pending salary
नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब आंदोलन
author img

By

Published : Nov 9, 2020, 1:04 PM IST

नागपूर - दिवाळीचा सण तोंडावर आला असूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा निकाली लागला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. आज एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सहकुटुंब आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. नागपूरातील एसटी कर्मचाऱ्यांनी घरातील सदस्यांसोबत आंदोलन सुरू केले आहे. 'आमच्या हक्काचा पगार द्या' या मागणीचे फलक हातात घेऊन कर्मचाऱ्यांच्या घरातील सदस्य सरकारला विनंती करत आहेत. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या करिता उपाययोजना केल्या नाही तर सरकारने कामगार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

तीन महिन्याच्या थकीत वेतनासाठी नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन

थकीत वेतनासाठी आंदोलन

गेल्या ३ महिन्यापासून थकीत असलेले वेतन आणि शासनाने लागू केलेले वाढीव वेतन लागू करा. या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून लाक्षणिक आंदोलने करत आहेत. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यानुसार आज हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले आहे. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेले कर्मचारी पगार नसल्यामुळे चांगलेच हतबल झाले आहेत, त्यातही दिवाळी कशी साजरी करायची, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

गेल्या महिन्यात आंदोलन केल्यानंतर मिळाला एक महिन्याच्या पगार -
तीन महिन्यांचा पगार आणि महागाई भत्ता राखडल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात एक दिवसांचे आंदोलन केल्यानंतर एक महिन्याच्या पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला असला तरी तीन महिन्यांच्या पगार अजूनही शिल्लकच आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना गृहीत धरले आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचा पगार थकीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे

औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करणार -
राज्य सरकारने मंगळवारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाही, तर कर्मचारी संघटना महामंडळाच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; ठाकरे सरकारला धरले जबाबदार

हेही वाचा -एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी आक्रोश आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.