ETV Bharat / city

नागपूर : रिझर्व बँकेच्या सुरक्षेसाठी तैनात एसआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या - रिसर्व्ह बँक

ही घटना रात्री उशिरा घडली. सर्व सुरक्षारक्षक आपल्या कर्तव्यावर असताना अचानक रिझर्व बँक परिसरात बंदुकीतून गोळी चालल्याचा आवाज आला. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही वेळानंतर एसआरपीएफचे जवान प्रसन्ना मस्के यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले.

एसआरपीएफ जवान प्रसन्ना मस्के
author img

By

Published : Jul 28, 2019, 8:14 AM IST

नागपूर - रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रसन्ना मस्के असे या जवानाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

ही घटना रात्री उशिरा घडली. सर्व सुरक्षा रक्षक आपल्या कर्तव्यावर असताना अचानक रिझर्व बँक परिसरात बंदुकीतून गोळी चालल्याचा आवाज आला. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही वेळानंतर एसआरपीएफचे जवान प्रसन्ना मस्के यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले. प्रसन्ना यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रसन्ना मस्के एसआरपीएफच्या ग्रुप 4 चे जवान होते. घटनेची माहिती समजताच सदर पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रसन्नाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रसन्नाने आत्महत्या केली, की हा घातपात होता, यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Intro:नागपूरच्या सदर परिसरात असलेल्या रिसर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे सुरक्षेसाठी तैनात एसआरपीएफ जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे....प्रसन्ना मस्के असे जवानाचे नाव असून त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा झालेला नाही Body: घटना रात्री उशिरा घडली आहे ..सर्व सुरक्षा रक्षक आपल्या कर्तव्यावर असताना अचानक रिसर्व्ह बँक परिसरात गोळी चालल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती..काही वेळातच प्रसन्ना मस्के यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याची निष्पन्न झाले... प्रसन्नाचा घटनास्थळीच मृत्यू झाला...प्रसन्ना मस्के srpf च्या ग्रुप 4 चे जवान होते...घटनेची माहिती समजताच सदर पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रसन्नाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे....प्रसन्ना ने आत्महत्या केली की हा घातपात होता या संदर्भात पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे

टीप- या बातमी साठी सध्या व्हिडीओ उपलब्ध झालेला नाही,नियमाने आरबीआय चे व्हिडीओ घेता येत नाहीत,काही फोटो मिळतील तर लगेच शेअर करतो सध्या ग्राफिक्स वर बातमी लावावी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.