नागपूर - पांढरी शुभ्र झुपकेदार दिसणारी अमेरिकन मेनकून मांजर आणि चित्याप्रमाणे अंगावर ठिपके असलेली बेंगॉली मांजरीने नागपूरकर मांजरीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. विदर्भात पहिल्यांदाच कॅट क्लब ऑफ इंडियाच्या वतीने मांजरीच्या शोचे ( Cat Show in Nagpur ) आयोजन करण्यात आले. यात परदेशी प्रजातीच्या मांजरीसह झुबकेदार केस, चमकदार रंगीत डोळ्यांच्या देशी मांजरी पाहण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली.


बिबट्यासारखी दिसणारी आकर्षक कॅट
छोटा बिबट्याप्रमाणे रंग असलेली बेंगॉल कॅटही लोकांना पसंतीस पडली. ही रशियन आणि डोमेस्टिक कॅटचे ब्रीड असून सुमारे 60 ते 70 वर्षाच्या नंतर हे ब्रीड तयार झाले आहे. भारतात बिबट्या पाळीव प्राणी म्हणून पाळता येत नाही. मात्र, त्याच रंगाची अंगावर ठिपके असणारी मांजर खास आकर्षण ठरली.

परदेशी प्रजातीच्या मांजरीचा पर्याय उपलब्ध
घरात पाळीव प्राणी म्हणून खासकरून कुत्रा पाळला जात होता. हळूहळू आता परदेशी प्रजातीचे श्वान घराघरात पाहायला मिळत आहे. याच पद्धतीने मांजरीमध्ये सुद्धा झुपकेदार आणि रंगीत असे परदेशी आणि हायब्रीड असलेले मांजरीच्या चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. यात श्वान हे घरात अस्वच्छता पसरवतात. त्या तुलनेत चाणाक्ष असलेली मांजर घरात घाण करत नाही.
हेही वाचा - Kopi Luwak.. मांजराच्या विष्ठेपासून तयार होते ही कॉफी... ही आहे जगातिल सर्वांत महागडी कॉफी