ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट; टाळेबंदीच्या काळात महाराजबाग प्राणिसंग्रहालय पर्यटकांशिवाय 'ओस' - अपडेट न्यूज इन नागपूर

काही वर्षांपूर्वी या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या पिंजऱ्यात जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेला प्रवेश आणि छायाचित्रण चांगलेच गाजले होते. महाराज बागमध्ये गर्दीचा ओघ सुरू असतो. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीने नागरिकांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे महाराज बाग प्राणीसंग्रहालय ओस पडले आहे.

Bag
महाराजबाग प्राणिसंग्रहालय नागपूर
author img

By

Published : May 24, 2020, 5:23 PM IST

नागपूर - विदर्भातील बच्चे कंपनी, आबालवृद्ध आणि तरुणाईच्या विरंगुळ्याच्या हक्काची जागा म्हणजे महाराजबाग प्राणी संग्रहालय. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून महाराजबाग प्राणिसंग्रहालय पर्यटकांशिवाय ओस पडलेले आहे. कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग यासाठी कारणीभूत ठरला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने गर्दी टाळण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या नागरिकांना बाहेर पडता येत नाही.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेलं महाराजबाग प्राणि संग्रहालय ब्रिटिशकालीन आहे. या ठिकाणी वाघ, बिबटसह अनेक हिंसक जंगली प्राणी आहेत. नागपुरात लहानाचे मोठे झालेल्या अनेक पिढ्या या महाराजबागने बघितल्या आहेत. कधीही पर्यटकांची गर्दी इथे कमी झाली नाही. मात्र कोरोना विषाणूंमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या या दोन महिन्यांच्या काळात महाराजबागेत एकही पर्यटक फिरकू शकला नाही. त्यामुळे वर्षाकाठी मिळणारा चार कोटी रुपयांचा महसूल प्रभावित झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सर्वाधिक गर्दी महाराजबागेत होते. हिरवळीच्या सानिध्यात महाराजबागेत मारलेला फेरफटका नक्कीच ऊर्जा देऊन जातो. सध्या पर्यटक मंडळी महाराजबागेत येऊ शकत नसली, तरी प्राणी संग्रहालय प्रशासनाने प्राण्याची पूर्ण काळजी घेतली आहे.

विदर्भातील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने महाराजबागेत प्राण्यांसाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय प्राण्यांच्या शरीरातील तापमान कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे देखील मारले जात आहेत. त्यांना कोणतेही इन्फेक्शन होऊ नये, यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जात आहे. महाराजबागेत ऐकन 25 कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या काळातसुद्धा ते २५ कर्मचारी जबाबदारीने प्राण्यांची काळजी घेत असल्याची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे प्रभारी डॉक्टर सुनील बावसकर यांनी दिली आहे.

महिनाभरापूर्वी अमेरिकेच्या न्यूयार्क येथील एका वाघाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर टायगर कॅपिटल असलेल्या नागपुरात गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्र आणि महाराज बाग प्राणी संग्रहालयात वाघांसह हरीण, बिबट्या, सांबरासह इतर प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. वन्य प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती असल्याने एपिडेमिक डीजिस एक्ट 1897च्या अनुसार प्राणि संग्रहालय प्रशासनांने उपाय योजना केल्या आहेत.

नागपूर येथील महाराजबाग प्राणिसंग्रहालय १५ मार्चपासून बंद आहे. प्राण्यांची देखरेख करणारे कर्मचारी तिथेच राहत आहेत. प्राण्यांमध्ये काही बदल दिसतो, कोरोनाची काही लक्षण दिसत आहेत का, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राण्यांच्या पिंजऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असून त्यांचा खुराक देखील वाढवण्यात आला आहे. प्राण्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महाराजबाग प्रशासनाने डाएट चार्टदेखील तयार केला आहे.

प्राणिसंग्रहालय दृष्टीक्षेप

काही वर्षांपूर्वी या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या पिंजऱ्यात जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेला प्रवेश आणि छायाचित्रण चांगलेच गाजले होते.

दिल्लीहून विमानाने दुसऱ्या वाघाचे रक्त आणून प्राणिसंग्रहालयातील वाघिणीला ते देण्याचा भारतातील पहिला प्रयोग महाराजबाग प्राणिसंग्रहालयातच झाला होता.

वन्यप्राणी दत्तक देण्याची प्रक्रिया याच प्राणिसंग्रहालयातून सुरू झाली आणि अभिनेता टायगर श्रॉफ याने एक वर्षासाठी वाघाला दत्तक घेतले.

वनखात्याकडे जखमी प्राण्यांना ठेवण्याची व्यवस्था नसताना याच प्राणिसंग्रहालयाने त्यांना आधार दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या अनेक छोटय़ामोठय़ा सहली महाराजबाग प्राणिसंग्रहालयाने अनुभवल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.