ETV Bharat / city

Etv Bharat Vijay Barse Special Interview: झुंड सिनेमात अमिताभ बच्चन साकारणार क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका, भेटा खऱ्या प्रशिक्षकाला!

author img

By

Published : Mar 3, 2022, 4:52 PM IST

Updated : Mar 3, 2022, 10:48 PM IST

फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांनी स्लम सॉकर ( slum soccer NGO ) या एनजीओच्या माध्यमातून 21 वर्षात अनेक खेळाडून घडविले आहेत. त्यामुळेच आज 250 खेळाडूंपेक्षा अधिक खेळाडू हे आंतरराष्ट्रीयस्तरावर ( slum soccer players ) चमकले आहे. यासोबतच स्लम सॉकर ही त्यांची संकल्पना 145 देशांत पोहोचली आहे. या संघर्षमय प्रवासाबाबत विजय बारसे यांनी ( Vijay Borse life interview ) ईटीव्ही भारतला माहिती दिली.

विजय बोरसे
विजय बोरसे

नागपूर - दिग्दर्शक नागराज मंजुळे ( Nagaraj Manjule Movie ) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत झुंड ( Zund movie release date ) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. हा चित्रपट नागपुरातील फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे ( football coach Vijay Barase ) यांच्या जीवनावर आधारित आहे. मागील 20 वर्षात ज्यांनी स्वतःचा मुलांकडे लक्ष न देता समाजातील वंचित घटकातील मुलांचे आयुष्य प्रकाशमय केले आहे. गुन्हेगारी आयुष्य जगत असलेल्या मुलांना खऱ्या अर्थाने आयुष्यात दिशा देणाऱ्या विजय बारसे यांच्या ईटीव्ही भारतने खास संवाद ( Special interview of Vijay Barase ) साधला आहे.

फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांनी स्लम सॉकर ( slum soccer NGO ) या एनजीओच्या माध्यमातून 21 वर्षात अनेक खेळाडूने घडविले आहेत. त्यामुळेच आज 250 खेळाडूंपेक्षा अधिक खेळाडू हे आंतरराष्ट्रीयस्तरावर ( slum soccer players ) चमकले आहे. यासोबतच स्लम सॉकर ही त्यांची संकल्पना 145 देशांत पोहोचली आहे. या संघर्षमय प्रवासाबाबत विजय बारसे यांनी ( Vijay Borse life interview ) ईटीव्ही भारतला माहिती दिली.

झुंडचे लागलेले पोस्टर
झुंडचे लागलेले पोस्टर

हेही वाचा-Inspirational Jhund Trailer :बिग बीच्या अभिनयाची कमाल, चित्तथरारक 'झुंड'चा ट्रेलर रिलीज

वंचित मुलांना आणले मुख्य प्रवाहात
विजय बारसे हे नागपूरच्या हिसलॉप कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. याच कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीमधील मुले बकेटला लाथा मारून फुटबॉल खेळताना दिसले. सन 2000 मध्ये हा प्रसंग घडला. त्यामधून झोपडपट्टी फुटबॉल म्हणजे स्लम फुटबॉल या संकल्पनेला उगम झाला. विजय बारसे यांना पुढील आयुष्य जगण्याचे ध्येय मिळाले. झोपडपट्टीतील मुले सकाळी चोऱ्या, दारू व गुन्हेगारी जगात गुंतलेले होते. त्या मुलांची ताकद फुटबॉलच्या मैदानावर पोहोचेल, तेव्हा मात्र जगाससमोर फुटबॉलचे चांगले खेळाडू घडतील, असा बारसे यांना विश्वास होता. हेच ओळखून त्यांनी वंचित मुलाना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले.

हेही वाचा-'झुंड' पाहून भारावला आमिर खान, नागराजसह टीमचे केले घरी स्वागत
नागराज मंजुळे कोण हे माहीतच नव्हते....
संघर्षमय वंचित घटकांच्या मुलांसाठी क्रीडा शिक्षक विजय बारसे यांनी केलेल्या कामाचा कहाणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना कळली. तेव्हा दिग्दर्शक नागराज मंजुळे यानी विजय बारसे यांची भेट घेण्याचे ठरविले. ही भेट अनेपेक्षित ठरली. कारण फुटबॉल म्हणजे एक विश्व मानणाऱ्या विजय बारसे यांना नागराज मंजुळे यांच्याविषयी काहीच माहित नव्हते. दिग्दर्श नागराज मंजुळे रात्री बारसे घरी पोहोचले. तोपर्यंत नागराज मंजुळे हे दिग्दर्शक असल्याचे बोरसे यांना माहीत नव्हते. झिंगाट गाण्याच्या लोकप्रियेमुळे विजय बारसे यांना चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ओळख समजली. मग विजय बारसे यांनी पाहुण्यांना घरात बोलावत गप्पा-टप्पा सुरू केल्या होत्या. त्याच मैदानावर चित्रपटाची मुहुर्तमेढ रोवली गेली.

रियल लाईफ हिरोचे महत्त्व
रियल लाईफ हिरो विजय बारसे यांची भूमिका महानायक बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन साकारणार असल्याचे निश्चित झाले. हे जेव्हा विजय बारसे यांना कळले तेव्हा त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. नागराज मंजुळे यांनी विजय बारसे यांच्या कार्यावर चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. त्यावरून विजय बारसे यांच्या कामाचे महत्त्व पटते. मुख्य भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन यांनी झुंडमधील भूमिकेला होकार दिला. याचा अर्थ विजय बारसे हे रसायन वेगळेच आहे, हे त्यांच्याही लक्षात आले असावे.

जगभरात पोहचले स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांचे नाव
विजय बारसे यांच्या स्लम सॉकर या एनजीओचे काम केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नाही. तर भारतात सुरू झालेली ही संकल्पना इतर देशांमध्येसुद्धा रुजली आहे. यासाठीसुद्धा विजय बारसे यांनी मोठे योगदान दिले आहे. गुन्हेगारी क्षेत्रात आयुष्याचे नुकसान करू पाहणाऱ्या मुलांना त्यांनी फुटबॉलमध्ये खेळाडू म्हणून घडविले. मुलांमधील ताकद आणि जिद्द या नकारात्मक ठिकाणी जाण्यापेक्षा योग्य ठिकाणी ही उर्जा त्यांनी गुंतविली. त्यांचे काम इतर देशात अशाच पद्धतीने सुरू झाले आहे. विजय बारसे यांच्यामुळे स्लम सॉकरचे जाळे जगभरात पसरत गेले. स्लम सॉकरचे काम सुमारे 145 देशांमध्ये सुरू आहे. त्यामधून शेकडो खेळाडूंना खेळाच्या मैदानावर आणले आहे. या प्रवासाच्या यशामुळे चित्रपटाची निर्मिती होत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी विजय बोरसे यांची भूमिका स्वीकारत त्यांच्या कामाला न्याय दिला आहे. तसेच जगभरात क्रीडाप्रसाराचे काम चित्रपटातून होणार आहे.

विजय बारसे यांची भूमिका महानायक बिग बी साकारणार

हेही वाचा-Nagraj Manjule on Jhund : अमिताभ बच्चन यांच्यामुळे झुंड हिंदीत -नागराज मंजूळे

झोपडपट्टी ते स्लम सॉकर... मुलगा अभिजितचा सिंहाचा वाटा...
झोपडपट्टी फुटबॉलला स्लम सॉकरपर्यंत नेण्याच्या प्रवासाचे सर्वाधिक श्रेय विजय बारसे हे मुलगा अभिजितला देतात. कधीकाळी वडिलांच्या कामाला नाकारून विदेशात निघून गेलेल्या मुलाने दुःख दिले होते. मात्र, वडिलांच्या कामाची किंमत कळल्यावर अभिजित बारसे भारतात परतले. वडिलांच्या कामाचे महत्त्व पटल्यावर अभिजित बारसे यांनी स्वतःला वाहून घेतले. तो क्षण आनंदाचा असल्याचे आणि अविस्मरणीय असल्याचे विजय बारसे सांगतात. चित्रपटात हा क्षण सुंदर पद्धतीने साकारला असल्याचे सांगतात. एकंदर या चित्रपटात विजय बारसे यांच्या जीवनाबद्दल साकारलेले सगळे क्षण त्यांच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित आहेत. या चित्रपटात मांडलेल्या भूमिकेपासून ते पूर्णतः समाधानी आहेत. खरेतर विजय बारसे हे काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर हा चित्रपट नक्कीच प्रत्येकांनी पाहिला पाहिजे. चित्रपटावरी मनोरंजन कर रद्द करावा, अशी विनंती विजय बारसे यांनी सरकारला केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना प्रेरणादायी प्रवास कळू शकले, असा विजय बारसे यांनी विश्वास आहे.

४ मार्च रोजी होणार प्रदर्शित, आमिर खाननेही केले कौतुक

अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. याआधी बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानने 'झुंड' हा चित्रपट पाहिला आणि चित्रपट पाहून त्याला धक्काच बसला. आमिर खानने चित्रपटातील प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन या चित्रपटात झोपडपट्टीतील मुलांची भूमिका साकारणाऱ्या छोट्या कलाकारांचे खुलेपणाने कौतुक केले आहे. त्याला हा चित्रपट इतका आवडला की आमिरने 'झुंड' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला घरी बोलावले आणि आपल्या मुलाची ओळख करुन दिली.

Last Updated : Mar 3, 2022, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.