ETV Bharat / city

गेल्या 24 तासांत नागपूर शहरातील विविध भागात सहा जणांचा मृत्यू; उष्मघाताची शक्यता - heatstroke death nagpur

उन्हाची तीव्रता वाढताच उष्मघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या 24 तासांत नागपूर शहरातील विविध भागात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतापनगर, सदर पारडी आणि पाचपवली पोलीस ठाण्याच्या विविध भागात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

temerature
तापमान
author img

By

Published : May 19, 2022, 12:33 PM IST

नागपूर - उन्हाची तीव्रता वाढताच उष्मघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या 24 तासांत नागपूर शहरातील विविध भागात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतापनगर, सदर पारडी आणि पाचपवली पोलीस ठाण्याच्या विविध भागात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या सर्वांचा मृत्यू उष्मघाताने तर झाला नसावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी सर्व मृतकांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

हेही वाचा - डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणारा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात

पहिली घटना - लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनिल सुखराम ऐळने (वय ५०) हे बेशुद्ध अवस्थेत मिळून आहे. त्यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दुसरी घटना - प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला मार्केट येथील विनस गारमेंट समोर एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ४५ ते ५० वर्ष बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. त्यांना उपचाराकरीता मेडीकल हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

तिसरी घटना - तिसरी घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गडड्रीगोदाम परिसरात घडली. थ्री ब्रदर्स दुकानासमोर एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. उपचाराकरीता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चवथी घटना - चवथी घटना सदर पोलीस हद्दीत डि.आर. एम ऑफिस मागील नाल्याजवळ घडली. एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. तिला उपचाराकरीता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पाचवी घटना - पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशाली नगरच्या भाग्यश्री अपार्टमेंटसमोर एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. उपचाराकरीता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

सहावी घटना - पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबेनगर एन.आय.टी मैदानाच्या भिंतीजवळ एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ६० वर्ष बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. तिला उपचाराकरीता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा - Hedgewar Smriti Bhavan : गेल्यावर्षी दोन दिवस नागपुरात मुक्कामी होता दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.