ETV Bharat / city

वृद्ध व्यक्तीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, पाचव्या क्रमांकाच्या पत्नीने केला खून - नागपूरातील खूना बद्दल बातमी

नागपूरातील वृद्ध व्यक्तीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या व्यक्तीचा खून त्याच्या पाच क्रमांकाच्या पत्नीने केला आहे.

Shocking revelation in the murder case of an old man in Nagpur
वृद्ध व्यक्तीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, पाचव्या क्रमांकाच्या पत्नीने केला खून
author img

By

Published : Mar 11, 2021, 5:50 PM IST

Updated : Mar 11, 2021, 7:27 PM IST

नागपूर - दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील गणेशपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रजात संकुलच्या फ्लॅट क्रमांक 103 मध्ये एका वृद्ध व्यक्तीचे हात-पाय खुर्चीला बांधून गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मृत लक्ष्मण मलिक यांचा खून त्यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नी स्वातीला केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी स्वातीला अटक करण्यात आली आहे. आर्थिक वाद आणि मुलाच्या ताब्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता, अशी माहिती देखील पोलिस आयुक्तांनी दिली आहे

वृद्ध व्यक्तीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, पाचव्या क्रमांकाच्या पत्नीने केला खून

काही दिवसांपासून मृत लक्ष्मण मलिक हे एकटेच रजत संकुल येथील फ्लॅटमध्ये राहत होते. ८ मार्चला संध्याकाळी त्यांची पाचव्या क्रमांकाची पत्नी स्वाती त्यांना भेटण्यासाठी त्या फ्लॅट वर गेली, यावेळी स्वातीने सोशल मीडियावर उपलब्ध असलेले आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून त्यांचे हात आणि पाय खुर्चीला बांधले, त्यानंतर तिने सोबत आणलेल्या धारधार चाकूने लक्ष्मण मलिक यांचा गळा चिरून खून केला. यानंतर स्वातीने घटनास्थळा वरून पळकाढला. दुसऱ्या दिवशी ९ मार्चला लक्ष्मण मलिक यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना समजली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

मृताचे अनेक महिलांशी संबंध -

मृताचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा खुलासा झाला. त्याच दरम्यान मृतक मलिक यांनी तब्बल पाच महिलांशी लग्न केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली, तेव्हा पोलिसांनी प्रत्येक महिलेला चौकशीसाठी बोलावून घेतले असताना स्वातीने ने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला होता, त्यानंतर पोलिसांनी स्वातीची कसून चौकशी केली, तेव्हा तिने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याची कबुली दिली.

खुन करण्यामागील कारण -

लक्ष्मण मलिक यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नीला मलिक कडून एक आठ वर्षांचा मुलगा आहे. त्या महिलेकडे आणखी एक तीन महिन्यांचे बाळ असल्याने या दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार ते बाळ तिने नातेवाईकांकडून दत्तक घेतले होते, तर मृता व्यक्तीला महिलेचे इतर पुरुषा सोबत संबंध असल्याचा संशय होता. मृत व्यक्ती हा सेवानिवृत्त असल्याने त्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातून या महिलेने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याचा खुलासा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे.

Last Updated : Mar 11, 2021, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.