ETV Bharat / city

नागपूर :...म्हणून शिवसेनेने हनुमान नगर झोनच्या मनपा कार्यालयात केली तोडफोड

पाणी साचल्याने राष्ट्रसंत नगरमध्ये राहणाऱ्या तरुणीला रुग्णालयात नेण्यास उशीर झाला आणि तिचा मृत्यू झाला. यामुळे तिच्या मृत्यूला महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

nagpur shivsena latest news
nagpur shivsena latest news
author img

By

Published : Sep 3, 2021, 12:48 AM IST

Updated : Sep 3, 2021, 1:15 AM IST

नागपूर - रस्त्यावर पाणी साचल्याने राष्ट्रसंत नगरमध्ये राहणाऱ्या तरुणीला रुग्णालयात नेण्यास उशीर झाला आणि तिचा मृत्यू झाला. यामुळे तिच्या मृत्यूला महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेने हनुमान नगर झोनच्या कार्यालयात तोडफोड केली.

प्रतिक्रिया

महापालिकेत शिवसैनिकांची तोडफोड -

नागपुरच्या राष्ट्रसंत नगरमध्ये राहणाऱ्या जानव्ही चिंचुलकर (17) या तरुणीची प्रकृती ३१ ऑगस्ट रोजी रात्री बिघडली. यावेळी तिला रुग्णालयात न्यायचे होते. पण त्या परिसरात सर्वत्र पाणी भरले असल्याने रुग्णवाहिका जाऊ शकत नव्हती. यावेळी रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्याची अडचण सध्याच्या नाल्यामुळे उपस्थित झाली होती. यामुळे घटनेबाबत कळताच संध्याकाळी परिसरातील नागरिक संतप्त झाले. यांनंतर शिवसैनिकांनी महापालिकेच्या हनुमान नगर झोनमध्ये जाऊन झोनमधील साहित्याची तोडफोड केली. दरम्यान, राष्ट्रसंत नगरपरिसरात एका बिल्डरने नाल्याचे पाणी सोडले. यामुळेच या भागात पाणी साचण्याचा समस्या उद्भवल्या आहेत. यामुळे या कंत्राटदारावरही मन्युष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच मुलीच्या कुटूंबाला आर्थिक मदत घ्यावी, ज्या नाल्यामुळे हा पाणी साचण्याचा प्रश्न उदभवला त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

हेही वाचा - राज्यातील प्रत्येक घरांत नळाद्वारे पोहचणार पाणी, २०२४ पर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणांना सुचना

Last Updated : Sep 3, 2021, 1:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.