नागपूर - माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या ( Uddhav Thackeray ) कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेतील 40 आमदारांचा गट फुटून ( Shivsena Rebel Mla ) स्वतंत्र झाला आणि त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सरकार स्थापनं केलं. त्यानंतर आता काही खासदारही शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या खासदारांची दिल्लीत बैठक झाल्याची माहितीही आहे. याबाबत खासदार कृपाल तुमाने ( Shivsena Mp Krupal Tumane ) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"ती चर्चा चुकीची..." - रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांची दिल्लीत डिनर डिप्लोमीसी झाली. त्यामध्ये 10 खासदार यात होते अशी चर्चा रंगल्याने नवीन खळबळ उडाली आहे. याबाबत 'ईटिव्ही भारत'ने कृपाल तुमाने यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, "मी नागपुरात आहे. मी दिल्लीत सध्या गेलो नसून सर्वच खासदार सध्या आपल्या मतदार संघात आहे. त्यामुळे बैठक आणि सध्या सुरू असलेली ही चर्चा चुकीची आहे. मी नागपुरमध्ये असताना दिल्लीत बैठक कशी होणार आहे. काही लोकांना पतंगा उडवण्याची सवय आहे. उडली तर उडली अश्या पद्धतीने चालतात. यात काही कोणाशी संपर्क झाला नाही, त्यामुळे भेटी नाही. आता लोकसभा सुरु होईल, तेव्हा भेटी गाठी होतात. यात महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी मोठी घटना झाली असल्याने काही लोक चर्चा करतात."
"शिंदे गटाकडून संपर्क नाही" - शिंदे गटाकडून अनेकांशी संपर्क होत असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Rebel Group ) गटाकडून संपर्क केला करण्यात आला का?, असा सवाल त्यांना उपस्थित करण्यात आला. "मला कोणीही काही संपर्क केला नाही. त्यामुळे आतून काही सुरू असले तरी या चर्चा खोट्या आहेत," असे तुमाने यांनी स्पष्ट केले.
रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल शिंदे गटात - रामटेक विधानसभा मतदार संघातील आमदार जे अपक्ष असले तरी शिवसेना पुरस्कृत आहेत. आशिष जैस्वाल यांनी नुकताच झालेल्या राजकीय भुकंपात शिंदे गटासोबत सामील झाले. त्यामुळे त्यांच्या मागून आता खासदार कृपाल तुमाने हे सुद्धा उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे खासदार तुमाने यांनी आरोपांना नकार दिला असला तरी, पुढील काही दिवस भर पावसाळ्यात राजकीय वातावरण गरम असणार आहे.
हेही वाचा - Maharashtra Politics : आगामी निवडणुकीची धाकधूक, बंडखोरांचे समर्थन, इच्छुकांची वाढली डोकेदुखी