ETV Bharat / city

Devendra Fadnavis On Rana controversy : राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते बनवण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे काय, फडणवीस यांचा सवाल

राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते बनवण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला विचारला ( Devendra Fadnavis On Rana controversy ) आहे. हनुमान चालीसा म्हटले असते तर कोणी दखल घेतली नसती. राणा दाम्पत्य हल्ला करण्यासाठी चालले नव्हते असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
author img

By

Published : Apr 23, 2022, 5:06 PM IST

नागपूर - हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) म्हणण्यावरून एवढा राडा का?. कोणाच्याही घरावर आंदोलन करू नये, अशी भाजपची भूमिका आहे. हनुमान चालीसा म्हणायला जात असताना शिवसेनेने एवढी माणसे गोळा करायची काही गरज नव्हती. हनुमान चालीसा म्हटले असते तर कोणी दखल घेतली नसती. राणा दाम्पत्य हल्ला करण्यासाठी चालले नव्हते. मात्र, राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते बनवण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला विचारला आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत ( Devendra Fadnavis On Rana controversy ) होते.

पोलिसांच्या भरवश्यावर सत्तेचा माज - देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राणा दाम्पत्याला अडवल्याने शिवसेनेच्या नेत्यांना सहानुभूती मिळेल, असे वाटत आहे. पण, तसे काही होणार नाही आहे. पोलिसांना हाताशी धरून हे सगळे चालले आहे. मोहित कंबोजवर चारशे लोक हल्ला करायला जातात हे पोलिसांच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही. हल्ला करून उलट त्यांच्यावर केसेस लावण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोक म्हणतात कंबोज तलवार, हॉकी स्टिक घेऊन होते, हे हास्यास्पद आहे. त्या भागात सगळीकडे सीसीटीव्ही आहे. आता, मुंबई पोलिसांकडे लक्ष असणार आहे ते दबावाला बळी पडून करवाई करतात, की नाही. त्यांची दंडुकेशाही म्हणजे पोलिसांच्या भरवश्यावर सत्तेचा माज सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

गृहमंत्रालयाने राष्ट्रवादीचे 12 वाजवले - गृहमंत्र्यांना माहिती आहे, राष्ट्रपती शासन केव्हा लागते. हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या परिस्थितीत गृहमंत्रालयाचे 12 वाजले आहे. पूर्वीचे गृहमंत्री जेलमध्ये आहेत. गृहमंत्रालयाचे राष्ट्रवादीने 12 वाजवले आहे. या परिस्थितीत आपले अपयश लपवण्यासाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याचे जनतेला माहिती आहे. राणा दाम्पत्य भाजप स्पॉन्सरड आहे, असा आरोप करण्यात येत आहे, जेव्हा महाविकास आघाडीकडून काही संभाळले जात नाही. तेव्हा भाजप स्पॉन्सर म्हणत आरोप केले जातात. स्वताचे अपयश लपवण्याचे ते काम करत असतात, अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

हे राजकारणी नसून शिवराळ लोक - संजय राऊत यांना विचारते तरी कोण, ते उद्या म्हणतील मी अमेरिकाच्या राष्ट्रपतीला घाबरत नाही. अमेरिकेचा राष्ट्रपती त्यांना विचारतो तरी काय, असे वक्तव्य करून राजकारणात परिवर्तन करू शकत नाही. त्यांना त्यांचा पक्षही गांभीऱ्याने घेत नाही आणि आम्हीही घेत नाही. ते शिवराळ राजकारणी आहेत. त्यांची भाषा कुटुंबा सोबत ऐकता येत नाही, हे राजकारणी नसून शिवराळ लोक आहेत, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर सोडले आहे.

हेही वाचा - Ravi Rana Called Off Protest : 'पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आंदोलन मागे घेत आहोत', राणा दाम्पत्याची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.