ETV Bharat / city

पेट्रोल, गॅस दरवाढ विरोधात शिवसेनेचे नागपुरात आंदोलन, दिला 'हा' इशारा

author img

By

Published : Mar 24, 2022, 8:58 AM IST

नुकतेच पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवण्यात आले आहे. याची झळ सामान्यांना बसत आहे. शिवसेनेकडून या दरवाढीचा विरोध होत आहे. बुधवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून ( Shiv Sena protest against hike in fuel prices ) दरवाढी विरोधात नागपूर शहरात आंदोलन करण्यात आले. ही दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Shiv Sena stages protest Nagpur hike fuel prices
शिवसेना आंदोलन नागपूर पेट्रोल दरवाढ

नागपूर - नुकतेच पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवण्यात आले आहे. शिवसेनेकडून या दरवाढीचा विरोध होत आहे. बुधवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून ( Shiv Sena protest against hike in fuel prices ) दरवाढी विरोधात नागपूर शहरात आंदोलन करण्यात आले. ही दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गोलीबार चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेकडून दरवाढीचा विरोध करण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास 'रेल रोको' चा इशारा देण्यात आला.

हेही वाचा - Raut On Modi : राऊत कडाडले! म्हणाले, दिल्लीतील पुतीनचा आमच्यावर CBI, ED नावाच्या मिसाईलने हल्ला

यावेळी शिवसेना नेते सूरज गोजे यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकार हे सामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी काम करत नाही. भाजपच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाच्या खोट्या घोषणांनी जनतेची फसवणूक झाली आहे. जर केंद्राने दरवाढ मागे घेतली नाही, तर सेनेकडून रेल रोको आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा गोजे यांनी दिला.

मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ झाली. तसेच, घरगुती वापराच्या गॅसच्या दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांची वाढ करण्यात आली. या नित्य गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढवल्याने नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.

हेही वाचा - International Water Day : नागपूरमध्ये जल दिनानिमित्त 'जल रेसिपी' स्पर्धा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.