ETV Bharat / city

नागपुरात गांधी गेटवर शिवराज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने साजरा - शिवराज्याभिषेक सोहळा

नागपुरातील गांधीगेट जवळील शिवाजी महाराज चौक, महाल येथे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित साजरा केला जात आहे.

Shiv Rajyabhishek ceremony celebrated at Gandhi Gate in Nagpur
नागपुरात गांधी गेटवर शिवराज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने साजरा
author img

By

Published : Jun 6, 2021, 9:23 AM IST

नागपूर - सकाळी नागपुरातील गांधीगेट जवळील शिवाजी महाराज चौक, महाल येथे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित साजरा केला जात आहे.

नागपुरात गांधी गेटवर शिवराज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने साजरा
सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर माल्यार्पण करून आरती करण्यात आली. यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या कार्यक्रमाला गांधीबाग झोनच्या सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक बंटी शेळके उपस्थित होते. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो. ढोल-ताशा, लेझीम पथक, मराठमोळ्या पेहरावसोबत उत्साहात रॅली काढली जात असे. पण कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा साधा पद्धतीने साजरा करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.