ETV Bharat / city

Sanjay Raut Criticism Shinde-BJP Gov: एकनाथ शिंदे सरकार बेकायदेशीर - संजय राऊत - Sanjay Raut Criticism Shinde BJP Gov

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर ( Sanjay Raut criticizes Shinde government ) टीका केली आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे. ज्यांनी मुख्यमंत्री होण्याचे शपथ घेतली त्यांच्यावर आपत्रातेची तलवार असतांना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असल्याची टिका राऊत यांनी केले. ते नागपूर येथे दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले असतांना त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला.

Sanjay Raut Criticism Shinde-BJP Gov
संजय राऊत यांची शिंदे-भाजप सरकारवर टीका
author img

By

Published : Jul 14, 2022, 8:17 PM IST

नागपूर - हे सरकार बेकायदेशीर आहे. ज्यांनी मुख्यमंत्री होण्याचे शपथ घेतली त्यांच्यावर आपत्रातेची तलवार असतांना त्यांचंबदलाचा कोर्टात अपात्रतेबद्दलचा निर्णय येणे बाकी असतांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या परिस्थितीत राज्यपाल यांनी मुख्यमंत्रीपदाची राजभवनातून शपथ देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे 19 तारखेला मंत्र्यांना शपथ देणे ही बेकायदेशीर ठरेल असे, म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. तसेच आता बंड विसरून जा असेही ते म्हणालेत. ते दोन दिवस नागपूर दौऱ्यावर असून राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदा नागपुरात आले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या आदेशाने पक्षबांधनीसाठी आलो असेही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांची शिंदे-भाजप सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंनी लोक हिताचे निर्णय घेतले - महाराष्ट्रात अद्याप शिंदे सरकारवर सरकार अस्तित्वात आलेले नाही म्हणत ( Sanjay Raut criticizes Shinde government ) त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत फक्त दोघांचीच कॅबिनेट बैठक झाली आहे. अजून सरकार का अस्तित्वात आले नाही. मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ( Former Chief Minister Uddhav Thackeray ) असतांना लोक हिताचे निर्णय घेतले होते. पण ते निर्णय बदलून केवळ विरोधासाठी विरोध म्हणून काम करत असेल तर ते चुकीचे आहे असेही म्हणालेत. दिवस बदलत असतात. सत्तांतर भविष्यातही होत असते. पुढे पाहू म्हणत इशारा सुद्धा दिला.

हेही वाचा - Petrol Diesel Rate in Maharashtra : राज्यात पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी होणार स्वस्त- मंत्रिमंडळाचा निर्णय

शिवसेनेला काही फरक पडला नाही - आता बंड विसरून जा मी उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात आलो आहे. कालपर्यंत मी मुख्यमंत्र्याच्या शहरातून येत होतो. पक्षाचा संघटनेच्या कामासाठी लोकांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे. शिवसैनिक सगळे जागच्या जागी आहे. जे चित्र महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत रंगवले जात आहे, हा भास आहे. हे सगळं तात्पुरता आहे. मागील 56 वर्षात शिवसेने आलेल्या अश्या अनेक संकटाना तोंड दिले आहे. शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करत आहे. हळूहळू हे सगळे चित्र स्पष्ट होईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात दोन दिवसांसाठी पाठवले. फक्त लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी संवाद साधण्यासाठी शिवसैनिकांची पदाधिकारी यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आलो आहे. पण नागपूर, ग्रामीण भागातील कोणतेही शिवसैनिक हे शिवसेनेतून बाहेर पडले नाही सर्वे जागच्या जागी आहे असेही राऊत म्हणालेत. त्यामुळे बंडखोर आमदार गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही असे, दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

पक्ष मजबुतीसाठी संघटनेसाठी वेळ द्ययाचा आहे - शिवसैनिक सगळे उपस्थित असल्याने चिंता नसावी. खासदार कृपाल तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते आलेले नाहीत असे विचारले असता मी शिवसैनिक विषयी बोलत आहे. इथे कोणाचे वैयक्तिकत कार्यकर्ते नाही. हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पक्षाचे शिवसैनिक असतात. कोण आले कोण गेले यात वेळ घालवायला वेळ नाही. आहे. पक्ष संघटना वाढवणे मजबुतीकडे वेळ देणे, काम करणे हे ध्येय आहे असेही, संजय राऊत म्हणाले. रामटेक मतदार संघातील खासदार कृपाल तुमाणे हे शिंदे गटाचा संपर्कात आहे अशा, चर्चा असतांना संजय राऊत यांनीही आज रामटेक मतदार संघातील लोकांशी चर्चा करणार आहे. पण पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकर लोकसभेतील आहे तो आकडा कायम असेल असेही, ते म्हणाले.

सरकारच्या निर्णयाचे स्वागत - पेट्रोल डिझेल स्वस्त झालेले आहे. लोकांना दिलासा मिळणार असेल तर चांगली गोष्ट आहे. यात सरकारने जर निर्णय घेतला असेल तर त्याचे स्वागत आहे. उदय सामंत म्हणाले शिवसेनेचे पंधरा खासदार संपर्कात आहे, यालाच उत्तर देताना राऊत यांनी टोला मारला. नशीब 115 बोलले नाहीत 15 असो की 115 असो शिवसेनेच्या खासदारांचा आकडा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत कायम राहील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Rescue Teams For Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचाव पथके; स्थलांतरितांसाठी व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.