ETV Bharat / city

Omicron Variant : ओमायक्रॉनची भीती नसावी, परंतु काळजी घेणे महत्त्वाचे - डॉ. उदय बोधनकर - ओमायक्रॉनची भीती नसावी पण काळजी घेणे महत्वाचे तज्ज्ञ

डेल्टामध्ये जे गंभीर रूप दिसून आले ते ओमायक्रॉनमध्ये अजून दिसून आलेले नाही. पण या व्हेरियंटचा धोका रुग्णांमध्ये दिसत नाही, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांशी ( Medical Experts in South Africa ) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलल्यावर पुढे आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर ( Senior Pediatrician Dr. Uday Bodhankar ) यांनी दिली आहे.

डॉ. उदय बोधनकर
डॉ. उदय बोधनकर
author img

By

Published : Dec 9, 2021, 5:17 PM IST

Updated : Dec 9, 2021, 5:27 PM IST

नागपूर - दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा ( Omicron Variant ) रुग्ण आढळल्यानंतर जगभरात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची भीती निर्माण झाली आहे. पण असे असले तरी हा व्हेरियंट डेल्टाच्या तुलनेत कमी धोकादायक असल्याचे आतापर्यंच्या माहितीवरून समोर आले आहे. यासोबतच याची लागण लहान मुलांना झालेली नाही. पण यात खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण याचा संसर्ग हा डेल्टाच्या तुलनेत तिप्पट असल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेत 24 डिसेंबरला ओमायक्रॉनचे ( Omicron was Found on December 24 in South Africa ) रुग्ण सापडले. हे रुग्ण तरुण वयातील असून त्यांना गंभीर लक्षणे नसल्याने रुग्णलायत दाखल करण्याची वेळ आली आहे. यासोबतच त्या रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल ( Oxygen Level ) सुद्धा कमी झाली नाही. त्यामुळे डेल्टामध्ये जे गंभीर रूप दिसून आले ते ओमायक्रॉनमध्ये अजून दिसून आलेले नाही. पण या व्हेरियंटचा धोका रुग्णांमध्ये दिसत नाही, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांशी ( Medical Experts in South Africa ) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलल्यावर पुढे आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर ( Senior Pediatrician Dr. Uday Bodhankar ) यांनी दिली आहे.

माहिती देतांना डॉ. उदय बोधनकर
  • डब्ल्यूएचओचे मत

कोरोनाचा नवीन व्हेरियंट डब्ल्यूएचओने व्हेरीयंट ऑफ कन्सर्न म्हणजेच घातक व्हायरस असे घोषित केले आहे. यामागचे दुसरे कारण म्हणजे कोरोना विषाणूवर जे प्रोटीन स्पाईक असतात त्यात जेवढे म्युटेशन होईल, तेवढा तो विषाणू घातक ठरणारा असतो. यात कोविड 19 मध्ये जेंव्हा बदल झाले त्यानंतर 3 पटीने म्युटेशन झाल्याने डेल्टा हा विषाणू निर्माण झाला. तेच ओमायक्रॉनमध्ये 30 ते 32 पटीने म्युटेशन झाले आहे. त्यामुळे डेल्टामध्ये जी आर व्हॅल्यू 1 ते 3 होती, त्यात ओमायक्रॉनमध्ये हीच आर व्हॅल्यू 1 ते 9 इतकी झाली आहे. त्यामुळे यापासून अधिक पटीने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका संभवतो आहे. यात तिसरी आणि गंभीर बाब म्हणजे या व्हायरसमध्ये इम्युन एस्केप आहे. ज्यांच्यामध्ये या विषाणू विरोधी इम्युनिटी आहे. ती वॅक्सिनमुळे असो की शारीरिक क्षमतेमुळे त्यांनाही ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटची लागण होऊ शकते, असेच निष्कर्ष पुढे आल्याने त्याला डब्ल्यूएचओने त्याला अधिक घातक म्हटले आहे.

  • कोणाला धोका अधिक संभवतो?

कोरोचा विषाणू हा एकापासून किती लोकांना संसर्ग होऊ शकतो याचे मापक म्हणजे आर व्हॅल्यूत सांगितले जातात. यात डेल्टामध्ये ही आर व्हॅल्यू कमी होता. यात ओमायक्रॉनमध्ये आर व्हॅल्यूही जास्त असल्याने म्हणजे 1 ते 9 असल्याने एकाला संसर्ग झाल्यास 9 लोकांना त्याचा संसर्ग आहे. हा गुणकार पाहता हा अधिक धोकादायक आहे. यात ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक असल्याने यात गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना यापासून अधिक धोका संभवतो. सध्यातरी याचा फैलाव हा ओमायक्रॉनचा संसर्ग 20 पेक्षा अधिक देशामध्ये झालेला आहे. त्यामुळे अजून कोणाचा मृत्यू झाला, अशी माहिती जरी समोर आली असली तरी ज्या पद्धतीने त्याचा प्रसार झाला आहे, ते पाहता खबरदारी घेण्याची अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. उदय बोधनकर सांगतात.

  • लहान मुलांना धोका आहे का?

ओमायक्रॉनची लागण ज्या देशात झाली आहे. आत्तापर्यंत आलेल्या निष्कर्षानुसार 18 वरील लागण झालेल्या रुग्णाचा समावेश आहे. लहान मुलांच्या लसीकरणाची जी ट्रायल नागपूरसह देशभरातील चार शहरात पार पडली, त्यात ती यशस्वी ठरल्याचे अहवाल आलेले आहे. त्यामुळे यात एक दोन आठवड्यात नक्कीच गुड न्यूज असेल की ज्यामध्ये मुलांसाठी सुद्धा लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण हे अधिकृत लवकर सरकारच्या वतीने स्पष्ट होईल, असेही डॉ. उदय बोधनकर म्हणाले.

  • 'घाबरून जाऊ नका पण लसीकरणासोबत काळजी नक्की घ्या'

ओमायक्रॉनचे मृत्यू सारखे गंभीर परिणाम हे नक्कीच दिसून येत नाही आहे. पण त्यामुळे घाबरून जाऊ नये लहान असो की मोठे सर्वांनी मास्क घालावे, सामाजिक अंतर पाळावे. यात दुसरे महत्वाचे म्हणजे लसीकरण करून घ्या, त्यात एक डोज घेतला म्हणून सुरक्षित न समजता दोन्ही डोज आवश्यक असल्याचे बोधनकर म्हणाले आहे.

हेही वाचा - राज्यात ओमायक्रोनचे 10 रुग्ण, घाबरू नका - आरोग्य मंत्री राजेश टोपे

Last Updated : Dec 9, 2021, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.