ETV Bharat / city

ड्रोनच्या मदतीने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधील वनात सीडबॉलद्वारे वृक्षारोपण

या प्रयोगाला यश मिळाल्यास राज्यभरातील वनपरिक्षेत्रात सिलबॉल ड्रोनच्या मदतीने पासून वृक्षारोपणाची व्यापक मोहीम अवघ्या काही तासात राबवली जाऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रोनच्याच मदतीने जंगलात टाकण्यात आलेले सिडबॉल उगवले की नाहीत,त्यांची वाढ कशी सुरू आहे यावर सुद्धा लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

seedballl
seedballl
author img

By

Published : Aug 5, 2021, 5:31 PM IST

नागपूर - तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघड वाटणारी बरीचशी कामे आता सोपी वाटू लागली आहे. असाच एक प्रयोग नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात करण्यात येतो आहे. नरखेड तालुक्याच्या वन परिक्षेत्रात पहिल्यांदाच ड्रोनच्या मदतीने सीडबॉल पाडले जात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग नरखेडच्या जंगलात केला जात आहे.

सीडबॉलद्वारे वृक्षारोपण

या प्रयोगाला यश मिळाल्यास राज्यभरातील वनपरिक्षेत्रात सिलबॉल ड्रोनच्या मदतीने पासून वृक्षारोपणाची व्यापक मोहीम अवघ्या काही तासात राबवली जाऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रोनच्याच मदतीने जंगलात टाकण्यात आलेले सिडबॉल उगवले की नाहीत,त्यांची वाढ कशी सुरू आहे यावर सुद्धा लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

वृक्ष लागवडीवर ठेवले जाणार लक्ष

राज्यातील अनेक जंगलामध्ये प्रत्यक्षात जाऊन वृक्षारोपण करणे शक्य नाही. अशा जंगलांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय वन्य प्राण्यांचा धोका असतोच. यावर उपाय म्हणून वनविभागाकडून ड्रोनच्या मदतीने जंगलात सिडबॉल टाकून वनपरिक्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या करिता नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वन परिक्षेत्राची निवड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला वनविभागाचा पायलेट प्रोजेक्ट आहे. ड्रोनच्या माध्यमातून सिडबॉल टाकण्यात आलेल्या परिसरात वृक्ष लागवडीच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाणार आहे

दीड लाख सी़डबॉल
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम भागातील एक हेक्टर मध्ये तीन हजार सिडबॉल या प्रमाणे ५० हेक्टर मध्ये दीड लाख सीडबॉल ड्रोनच्या टाकण्यात आले आहेत. ड्रोनचा योग्य पद्धतीने उपयोग करून झाड लावण्याचा हा नाविन्यपूर्ण आणि आगळा वेगळा उपक्रम असून वनीकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सिद्ध होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.